हजारो चीनी सैनिकांना पुरून उरला एकटा भारतीय जवान.. ७२ तासात पाठविले ३०० चीनी सैनिक यमसदनी पाठविले..

१७ नोव्हेंबर १९६२चा तो दिवस होता, जेव्हा चीनने चौथ्या वेळेस अरुणाचल प्रदेशवर हल्ला केला होता. चीनला पूर्ण अरुणाचल प्रदेश ताब्यात घ्यायचे होते. हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इंडो चायना युध्द सुरु होते. परंतु चीनला हे अशक्यप्राय करून सोडले एकट्या गाढवाल रायफलच्या भारतीय जवानाने ज्याचे नाव होते रायफलमॅन जसवंत सिंह रावत. आज खासरे वर या महान वीरपुत्राबद्दल माहिती बघूया…

इंडो-चायना वॉर 20 ऑक्टोंबर, १९६२ ते २१ नोव्हेंबर १९६२ पर्यंत चालले. परंतु १७ नोव्हेंबर पासून सलग ७२ तास जसवंत सिंह ज्या हिमतीने चीनी सैनिकांचा सामना करत होते तो क्षण त्यांचे शौर्य आणि वीरता दाखवून देतो. १९ ऑगस्टला या वीर जवानाचा वाढदिवस असतो.

जसवंत सिंह यांच्या हिम्मतीचे किस्से

नुरारंगच्या या लढाईत चीनी सेना मिडीयम मशीन गण (MMG) घेऊन जोरदार फायरिंग करीत होते. ज्यामुळे गढवाल रायफल्सचे सैनिक कठीण प्रसंगात अडकले होते. या कठीण वेळेत भारताच्या तीन सैनिकांनी युद्धाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. हे होते रायफलमॅन जसवंत सिंह, लान्स नायक त्रिलोक सिंह आणि रायफलमॅन गोपाल सिंह. हे तिघे या सर्व गोळीबारात वाचून चीनी सैन्याच्या बंकरपर्यंत पोहचले आणि क्षत्रू सैन्याच्या शेकडो सैनिकांना मारून त्याच्या MMG हिसकावून आणल्या.

त्रिलोक आणि जसवंत सिंह MMG घेऊन भारतीय भागात सुरक्षित ठिकाणी पोहचणारच तेव्हा उरलेल्या चीनी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्याचा वर्षाव सुरु केला या गोळीबारात दोघेही तिथेच शहीद झाले त्यानंतर ह्या MMG भारतीय बंकर पर्यंत पोहचवायचे काम गोपाल सिंह यांनी केले. याच विरतेची अदभूत प्रचीती देणाऱ्या प्रसंगामुळे चीनी सैन्यास अरुणाचल प्रदेश जिंकणे एक स्वप्न बनून राहिले.

अरुणाचल प्रदेशमध्ये जसवंत सिंह यांच्या विरतेची आणखी एक गोष्ट सांगितल्या जाते. १७ नोव्हेंबर १९६२ रोजी गाढवाल रायफलचे अनेक जवान शहीद झाले होते. जसवंत सिंह एकटे १० हजार फुट उंचीवर आपल्या पोस्टवर क्षत्रूचा सामना करत होते. यावेळेस त्याची मदत स्थानिक दोन युवकांनी केली ज्यांचे नाव होते सेला आणि नूरा हे दोघेही मातीचे भांडे बनवत असे.

यांच्या मदतीने जसवंत सिंह यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हत्यार लपविले आणि चीनी सैन्यावर हल्ला केला. ते चीनी सैन्याच्या एका तुकडी सोबत एकटे लढत होते. त्यांनी एकट्यानी ३०० चीनी सैनिकांनी यमसदनी धाडले.

चीनी सैनिका सोबत लढताना जसवंत सिंह घायाळ झाले. चीनी सैनिकांनी त्यांना बंदी बनवून मारून टाकले. परंतु तो पर्यंत भारतीय सैन्याच्या इतर तुकड्या युद्धभूमीवर पोहचल्या होत्या आणि चीनी सैनिकांना परतावे लागले. या पराक्रमाकरिता जसवंत सिंह यांना महावीर चक्र आणि त्रिलोक सिंह व गोपाल सिंह यान वीर चक्र देण्यात आले.

ज्या ठिकाणी जसवंत सिंह शहीद झाले तिथे एक खोली बनविण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांच्या करिता एक पलंग ठेवण्यात आला आहे आणि या पोस्टवर कार्यरत असलेला जवान रोज या बेडवरील चादर बदलवतो आणी बेडच्या बाजूस त्यांचे पॉलिश केलेले बूट ठेवले जातात.

जसवंत सिंह रावत यांना खासरे तर्फे मानाचा मुजरा… लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका!

वाचा कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याचा शेर शहा..
वाचा देशाकरिता मरणयातना भोगणारा सैनिक चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल व २ महिने कोठडी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.