जपमाळेत एकशे आठच मनी का असतात ?

भारतीय संस्कृती आणि अध्यात्म याच नात पुरातन आहे. देवाचे नामस्मरण करण्यास यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. नामस्मरण करण्यासाठी विविध साधनाचा वापर केल्या जातो त्यापैकी एक जपमाला हे आहे. जपाचे पूर्णत्व, मंत्रजपाची संख्या व हव्नातील आहुतीच्या संख्येवर अवलंबून असते.

जपमाला कोणतीही असो त्यामध्ये १०८च मनी असतात. हि संख्या आपण नेहमी ऐकत आला असाल. मोठमोठे साधू संतही आपल्या नावाच्या पुढे श्री श्री १०८चा वापर करतात. त्रिदेवांच्या पूजा आराधनेतहि १०९ नावांनिच जप केला जातो. मालेत १०८च मनी का असतात याचे वैज्ञानिक,अध्यात्मिक व ज्योतिषीय कारणही आहे.

जगात कालगणना सूर्याने होत असते. सूर्यच प्रत्येक वस्तू च्ल्वतो संपूर्ण वर्षात सूर्य १२ राशीमध्ये फेरी मारून ३६० अंश पूर्ण करतो. ३६० अंशाना ६० ने गुणल्यास २१६०० कला होतात. या कला दोन आयनांत पडतात. सहा म्हिनिए सूर्य दक्षिणयनात व सहा महिने उत्तरयनात असतो. एका आयनात २१ हजार ६०० च्या निम्मे म्हणजेच १० हजार ८०० कला येतात.

याचप्रमाणे सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयापर्यंत ६० घडी असतात. एका घडीत २४ मिनिटे असतात. १ घडीत ६० पळ व एका पळात ६० विपळ असतात. अर्थातच २४ तास वा ६० घडीत ६० गुणिले ६० गुणिले ६० म्हणजेच २१ हजार ६०० विपळ होतात. अर्थात अर्ध्या दिवसात म्हणजेच १२ तासात १० हजार ८०० विपळ येतात. जर शेवटची दोन शून्य सोडली तर वर्ष व दिवसाच्या सूर्य संचाराच्या संख्येत १०८च उरतात.

शनिचे अंक

१०८ मध्ये १ आणि ८ सूर्य व शनिचे अंक आहेत. ज्यामध्ये सूर्य आत्माकारक आहे. तर शनी आत्म्याच्या बोध करणारा ग्रह मानला जातो. शनी सूर्यपुत्रही आहे. तसेच साधूवादाचाही ग्रह आहे. १ आणि ८ मिळून ब्रम्हाचा बोध करीत असतात. जे शून्य रुपात एक आणि आठ (१-०-८) च्या मध्ये पडते.

९ शक्तीचे प्रतिक

हीच १०८ संख्या जेव्हा माळेत येते तेव्हा हि काळाचा बोध करीत असते. १०८ मण्याची माळ १०० वेळा जपल्यास १२ तास होतात. १०८च्या अंकाची बेरीज ९ होते. जी सर्वशक्तिमान संख्या मानली जाते. कोणत्याही संख्येला ९ ने गुणले तर गुनाकारातील अंकाची बेरीज ९च येते. अर्थातच ९ शक्तीचे प्रतिक आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.