आयपीएलमध्ये अंपायरला एका सिजनसाठी किती पगार मिळतो माहिती आहे का?

आयपीएल २०२० चा १३ वा मौसम यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. ‘बीसीसीआय’ने १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल २०२० खेळवण्याचे निश्चित केले. आयपीएलमधील सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २ वाजता (यूएईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता) सुरू होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलची संपूर्ण टुर्नामेंट रंगणार आहे.

आयपीएलने देशातील युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून अनेक खेळाडूंनी निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आणि भारतीय संघात देखील स्थान मिळवले.

इंडियन प्रीमिअर लीगने युवा खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याचबरोबर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. आयपीएलने अनेक अनोळखी खेळाडूंना जगासमोर आणण्याचं काम केलं आहे. फक्त भारतीय संघालाच नाही तर इतर देशांना देखील आयपीएलने खेळाडू दिले.

भारताचे सध्याचे आघाडीचे खेळाडू जसप्रीत बुमहरा आणि हार्दिक पांड्या हे देखील आयपीएलनेच दिलेले रत्न आहेत. आयपीएल दरम्यान करोडो देशात होते. आयपीलशी निगडित सर्वांनाच मालामाल होण्याची संधी देखील मिळाली. अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोल्या लागल्या. आयपीएलने फक्त खेळाडूंनाच मालामाल केले असे नाही.

आयपीएलमध्ये सामनाधिकारी आणि पंच(अंपायर) यांना देखील मालामाल बनवले आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या २०१९ च्या हंगामात पंच आणि सामनाधिकारी यांना किती मानधन देण्यात आले याची यादी जाहीर केली होती.

मागील वर्षीच्या हंगामात अंपायरना आणि सामानाधिकारी यांना भरघोष पगार मिळत असल्याचे या यादीतून समोर आले. बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार भारताचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ सर्वाधिक मानधन घेणारा सामनाधिकारी ठरला. सामनाधिकारी राहिलेल्या श्रीनाथला मागील हंगामात ५२ लाख रुपये मानधन देण्यात आले.

श्रीनाथ यांच्यानंतर एस रवी यांना ४२ लाख रुपये, मनू नायर यांना ४१ लाख रुपये, सी. शामसुद्दीन यांना ४१ लाख रुपये, नंदन यांना ३७ लाख रुपये, अनिल दांडेकर यांना ३२ लाख रुपये, यशवंत बर्डे यांना ३२ लाख रुपये आणि नारायणकुट्टी व्ही यांना ३२ लाख रुपये मानधन मिळाले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.