शेतकर्याचे सर्वाधिक नुकसान अस्मानी संकटानंतर कशाने होत असेल तर ते आहे रोग व कीड त्यामुळे ह्या रोगकीड विषयी आम्ही तुम्हाला देत आहो संपूर्ण खासरे माहिती..
खोडकीडा
ही कीड खोड पोखरते व फुटवे मरतात किंवा लोंब्या पांढऱ्या पडतात.
पाने गुंडाळणारी अळी
हिरव्या रंगाची ही अळी पाने गुंडाळून घेते व आतून पोषण मिळवते.पानावरील पांढरे पट्टे पाने किडल्याचे दर्शवतात.
काने
ह्या अळ्या रात्री पिकावर हल्ला करतात आणि लोंब्याचे नुकसान करतात.त्यामुळे लोम्ब्याचा पोंगा बनतो.
लष्करी अळी
ह्या असंख्य अळ्या भात पिकावर हल्ला करून पाने खाऊन टाकतात.त्यामुळे पिकाचा खराटा होतो.
सुरळीतील अळी
ही अळी रोपांच्या पानाचे लहान लहान तुकडे करून त्यांच्या सुरळ्या करते व सुरळीत लपून पानाचा फडशा पाडते.
तुडतुडे
हिरवे किंवा पांढरे तुडतुडे व त्यांचे पिल्ले रोपांच्या पानातील रस शोषून घेतात. टुंग्रो नामक सूक्ष्म जिवाणूंचा रोग ते फैलावतात.
रोपावरील तपकिरी तुडतुडे
रोपांच्या मुळाशी पाण्याच्या पातळीवर असंख्य तुडतुडे तयार होतात. त्यांच्या रस शोषणाने पाने पिवळी पडून झपाट्याने सुकून जातात.ते खुरटे जिवाणू फैलावतात.
काटेरी भुंगे
हे काटेरी काळे भुंगेरे किंवा त्यांच्या अळ्या पानाचे नुकसान करतात.त्यामुळे पानावर पांढऱ्या रेषा दिसतात.
गादमाशी
ह्या अळ्या कोंब पोखरतात.त्यामुळे त्यांचा पोंगा बनतो.
करपा
बुरशी धरते व त्यामुळे पानांवर मध्ये करडे लांबट डाग पडतात.दूषित देठे व पेरे सडतात व लोंब्या तुटून पडतात.
तपकिरी टिपके
या बुरशीमुळे लंबगोल आकाराचे किंवा वाटोळे गडद तपकिरी टिपके पानावर पडतात.मध्यभागी ते करडे असतात व त्यांना पिवळसर कड असते.
कणसाचा रोग
पानांच्या पोटरीवर करड्या रंगाचे हिरवट टिपके पडून दाणा भरण्यास अडथळा होतो.
पिकावरील कीटक व नुकसानीचा प्रकार
मावा
ही शेंड्यावर खालच्या बाजूला आढळते.अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पाने मुरडतात व रोपांची वाढ खुंटते.
तुडतुडे
अन्नरस शोषून घेणारे हे कीटक पानाच्या मागच्या बाजूस आढळतात. या किडी मुले रोपांची वाढ खुंटते.पाने बाजूस मुरडली जातात व कडा तपकिरी दिसू लागतो.
खरड्या
ही कीड पानाच्या खालच्या भागावर दिसून येते.ती रोपांचा अन्नरस शोषून घेते.त्यामुळे पाने पिवळी पडतात.खालून पाने तपकिरी दिसू लागतात आणि त्यांच्या कड्या वरच्या बाजूस वळतात.
लाल कोळी
हे अति सूक्ष्म कीटक असून मोठ्या प्रमाणात ह्या कीटकांचे थवेच्या थवे पानाच्या खाली दिसून येतात .पानांच्या वरच्या अंगाला पांढरे टिपके पडतात.त्यांचा हल्ला तीव्र असेल तर पाने विटकरी पडू लागतात.
पांढरी माशी
छोट्या अवस्थेत ही पिल्ले पानावरील अन्नरस शोषून घेतात.त्यामुळे रोपांची वाढ खुंटते मोठ्या झालेल्या पांढऱ्या माश्याही पानांवर दिसून येतात.पाने खराब होऊन सुरकुततात व फिकटतात.
करड्या रंगाचे भुंगेरे (टोके)
मोठे झालेले भुंगेरे कोवळ्या पानावर पोसतात.अळी अवस्थेत असताना ते पिकांच्या कोवळ्या मुळांवर पोसतात.
ठिपकेदार बोंड अळी
ही अळी रोपांच्या शेंड्यात व कोवळ्या बोंडात शिरून नुकसान करते.शेंडे सुकून जातात.त्या बोंडाचा नाश करून सरकीवर पोसतात आणि बोंडातील कापूस डागळतात.
गुलाबी बोंडअळी
या अळ्या गुलाबी दिसतात.पीक फुलोऱ्यावर येते वेळी ही कीड लागते व फुले व बोंड गळून पडतात. कोवळ्या बोंडात शिरून ही कीड आतील सरकीवर पोसते. कपाशीचे तंतू डागळतात.
अमेरिकन बोंडअळी (हिरवी बोंडअळी ) हेलिओथीस स्पे.
सुरुवातीला ह्या छोट्या अळ्या हिरव्या दिसतात.अनिबौध्ये वाढीप्रमाणे त्यांच्या अंगावर तपकिरी पट्टे दिसू लागतात.एका बोंडा वरून दुसऱ्या बोंडावर जाऊन त्या बोंडाना भोके पाडून पिकांचे नुकसान करतात.