बरेच वेळा लोकं तक्रार करतात की, परदेशात जाणे फार महाग आहे. एक तर दुसऱ्या देशातील तिकिटाचे दर आणि दुसऱ्या देशांचे चलन हे भारतीय रुपयांपेक्षा बरेच महाग आहेत. पण आपण आता जाणून घेणार आहोत काही अशा देशांबद्दल जिथे भारतीय रुपयाची किंमत खूप जास्त आहे. या देताहेत गेल्यानंतर खिशात थोडे पैसे असले तरी तुम्हाला श्रीमंत असल्याचा फील येईल.
1. पाकिस्तान-
पाकिस्तानी रुपया हे पाकिस्तान चे अधिकृत चलन आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान पाकिस्तानी रुपया वर नियंत्रण ठेवते. भारतीय 1 रुपयाची किंमत पाकिस्तानी रुपयाच्या 1.58 रुपयाच्या बरोबर आहे.
2. नेपाळ-
नेपाळचे चलन नेपाळीज रुपया या नावाने ओळखले जाते. नेपाळ राष्ट्र बँक नेपाळच्या चलनावर नियंत्रण ठेवते. नेपाळीज रुपया 1932 साली मार्केटमध्ये आला. त्या अगोदर नेपाळीज मोहर हे नेपाळ देशाचे चलन होते. 1.66 नेपाळीज रुपया ची किंमत भारताच्या 1 रुपयाच्या बरोबर आहे.
3 श्रीलंका-
सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका श्रीलंकन चलनावर नियंत्रण ठेवते. भारतीय रुपयाला श्रीलंकेत दुप्पट किंमत आहे. तुम्ही श्रीलंकेत 10000 रुपये घेऊन गेलात तर त्याची किंमत श्रीलंकेत 20160 रुपये आहे. म्हणजेच भारतीय 1 रुपयाची किंमत श्रीलंकेच्या 2.08 रुपये इतकी आहे.
4. आईसलँड-
आईसलँडचे चलन आईसलँडिक कोरोना म्हणून ओळखले जाते. स्वतःचे चलन आणि नियंत्रण पॉलीसी असणारा आईसलँड हा सर्वात छोटा देश आहे. भारतीय 1 रुपयाचे मूल्य आईसलँड मध्ये 2.13 आईसलँडिक कोरोना आहे.
5. हंगेरी-
हंगेरीचे चलन हंगेरीअन फॉरींट या नावाने ओळखले जाते. हंगेरीचे चलन 100 फिलर मध्ये डिव्हाईड केलेले आहे. भारतीय 1 रुपयाचे हंगेरीअन मूल्य 4.22 फॉरींट आहे.
6. कॉस्टारिका-
कॉस्टारिकन कोलोन कॉस्टारिका चे चलन आहे. कॉस्टारिका मध्ये यूएस डॉलर ला ही चलन म्हणून वापरण्यास परवानगी आहे.
कॉस्टारिका मध्ये एका भारतीय रुपयाची किंमत 8.15 कोलोन आहे.
7.मंगोलिया-
मंगोलियाचे चलन टग्रीक किंवा टग्रोग या नावाने ओळखले जाते. भारतीय रुपयाचे मूल्य मंगोलिया मध्ये 29.83 टग्रीक आहे.
8. कंबोडिया-
कंबोडियाचे चलन कंबोडिअन रिल या नावाने ओळखले जाते. कंबोडियामध्ये भारतीय रुपयाला 63.93 रिल एव्हडी किंमत आहे. कंबोडियामध्ये रिल2 प्रकारच्या आहेत, एक 1953 ते 1975 च्या दरम्यान जारी करण्यात आली तर दुसरी 1975 ते 1980 च्या दरम्यान जारी करण्यात आली.
9. पैरग्वे-
पैरग्वेच्या चलनाला पैरेग्वेअन गुआराणी या नावाने ओळखले जाते. गुआराणी ला 100 सेन्टीमोज मध्ये विभागण्यात येते. सध्या पैरग्वे मध्ये सेन्टीमोज वापरात नाहीयेत. भारतीय 1 रुपयाची किंमत 74.26 गुआराणी आहे.
10. इंडोनेशिया-
रुपीआह हे इंडोनेशियाचे अधिकृत चलन आहे. रुपीआहला बँक ऑफ इंडोनेशिया जरी करते व त्यावर नियंत्रण ठेवते. 1 भारतीय रुपयाची किंमत इंडोनेशियाच्या 204.763 रुपीआह इतकी आहे.
11. बेलारूस-
बेलारूसचे चलन रुबल या नावाने ओळखले जाते. बेलारूस मध्ये भारतीय रुपयाची किंमत 216 रुबल आहे.
12. व्हिएतनाम-
व्हिएतनामी डाँग हे व्हिएतनाम चे अधिकृत चलन आहे. डाँग हे 3 मे 1978 पासून व्हिएतनामचे चलन आहे.
भारतीय रुपयाचे व्हिएतनाम मधील मूल्य 338 डाँग आहे.
या देशांमध्ये तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला आपण खूप श्रीमंत असल्याचा अनुभव नक्कीच येईल.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.
जाणून घ्या प्रवासाकरिता जगातील सर्वात स्वस्त देश ७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल
जगातील सर्वात महागडी दारु व त्यांच्या किमती तुम्हाला माहिती आहेत का?
Leave a Reply