पोस्टमध्ये आरडी करणे म्हणून फायदेशीर आहे.. वाचा काही कारणे

नवी दिल्ली- बऱ्याचदा सामान्य लोकांना वाटतं की, छोटी गुंतवणूक जास्त फायदेशीर नाही. जास्त पैसे गुंतवल्यास फायदाही जास्त मिळतो, अशीही अनेकांची धारणा आहे. जर आपल्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नसले तरी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. पोस्टात गुंतवलेल्या पैशांची हमी तर मिळतेच, शिवाय त्यावर व्याजाच्या स्वरूपात जास्त फायदा पोहोचतो.

भारतात आवर्ती ठेव योजना म्हणजे ‘आरडी’ (Recurring deposit) एक लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत व्यक्ती कमी रक्कम भरून मॅच्योरिटीवर मोठी रक्कम मिळवू शकतो. आता निघालेल्या नवीन सुविधेमुळे आपण घरबसल्या ऑनलाइन ‘आरडी’ अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकता.

आरडी खातं पोस्ट ऑफिस किंवा जाऊन उघडता येतं, तसेच आपण हे खातं ऑनलाइनही उघडू शकतो. पोस्टात आरडी उघडण्यासाठी तुम्हाला रोख रक्कम किंवा धनादेश द्यावा लागतो. तुमचं खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्येही ट्रान्सफर करता येते. तसेच दोन जणांच्या नावे संयुक्त खातंही उघडता येते. आरडी खातं उघडण्यापूर्वी पहिल्यांदा कुठे जास्त व्याज मिळत ते पाहावे.

जर आपल्याला आरडीवर 10 हजारांहून अधिक व्याज मिळत असेल तर त्यावर आपल्याला कर द्यावा लागू शकतो. पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 7.3 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल.

महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या बचतीनुसार दरमहिन्याला मनानुसार बचत करू शकता. इथे तुम्ही कमी जास्त रक्कम भरू शकता. आणि विशेष म्हणजे एका विशिष्ट लक्ष्यानुसार तुम्ही रक्कम बचत करू शकता.

आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही सुरवातीपासून शेवटपर्यंत मिळणारे व्याजदर निश्चित स्वरूपाचे आहे. हा सर्वात मोठा फायदा आहे. नियमित व्याजसह फिक्स deposit साठीही फायदा होतो. तुम्ही १० वर्षापर्यंत हि मुदतवाढ करू शकता.

एका वर्षानंतर तुम्ही बचत खात्यातून ५०% रक्कम देखील तुम्ही काढू शकता. पोस्ट ऑफिसच्या RDवर वर्षाला 7.3 टक्के व्याज मिळतं. हे चक्रवाढ व्याजासारखं असतं. दर तिमाहीत व्याजदरात बदल होत असतो. अशातच आपण आरडीमध्ये 3 हजार रुपये गुंतवल्यास 5 वर्षांनी 7.3 टक्के वार्षिक व्याजानुसार आपल्या खात्यात 2,17,515 रुपये जमा होणार आहे. म्हणजे 5 वर्षांत आपल्याला जवळपास 37,515 रुपये अतिरिक्त फायदा मिळणार आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायाल विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.