पूर्व लडाखच्या गलवान व्हॅली भागात भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढला आहे. सोमवारी रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून त्यामध्ये भारताचे तीन तर चीनचे पाच लोक मारले गेले आहेत.
या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार सीमेवर कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही, परंतु दोन्ही बाजूंच्या सैन्याचे भरपूर रक्त सांडले आहे. बातमी आहे की या हाणामारीत काठ्या आणि दगडांचा वापर करण्यात आला आहे. मग आप्ल्यालाहि प्रश्न पडला असेल की १४००० फूट उंचावर अण्वस्त्रसज्ज असणाऱ्या भारत आणि चीनचे सैन्य काठ्यांनी आणि दगडांनी हाणामाऱ्या का करत आहे ? चला तर जाणून घेऊया…
४५ वर्षानंतर कुठल्या सैनिकाचा गेला आहे जीव
भारत आणि चीन यांच्यामध्ये १९७५ मध्ये चीनने घात करुन अरुणाचल प्रदेशावर हल्ला केला होता ज्यात भारताचे चार जवान मारले गेले होते. त्यावेळी चीनने सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत प्रवेश करुन हल्ला केल्याचा भारताने आरोप केला होता. परंतु चीनने नेहमीप्रमाणे त्याचा इन्कार केला होता. तेव्हापासून गलवान व्हॅलीतील प्रकरणापर्यंत मागच्या ४५ वर्षात भारत-चीन सीमेवरील तणावात कोणाचा जीव गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी रात्री भारतीय सैन्याचा एक अधिकारी आणि दोन जवान मारले गेले आहेत.
अण्वस्त्रसज्ज भारत आणि चीनचे सैनिक आपसात लाठ्याकाठ्यांनी आणि दगडांनी का भांडतात ?
भारत-पाकिस्तान सीमेवरील गोळीबार ही नित्याची बाब बनली आहे, परंतु ३५०० किमीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर होणाऱ्या तणावानंतरही भारत-चीन यांच्यातील वाद हाणामारीपर्यंतच सीमित राहतो, यामागे काय कारण असेल ? तर यामागे कारण असे आहे, की भारत आणि चीन यांच्यामध्ये १९९३ साली “नटेनेंस ऑफ पीस ऐंड ट्रैंक्विलिटी” हा करार झाला आहे.
या करारानुसार ठरले आहे की भारत आणि चीन यांच्यात कितीही मतभेद निर्माण झाले तरी त्याचा परिणाम सीमारेषेवर होता काम नये. सीमेवर जे सैनिक तैनात असतील, त्यांच्याकडे शस्त्र नसतील. रँकवर कुठल्या अधिकाऱ्याकडे बंदूक असेल तर तिचे तोंड जमिनीकडे असेल. त्यामुळेच सीमारेषेवर दोन्ही बाजूचे सैनिक निशस्त्र हातापायांनीच एकमेकांशी भांडतात, त्यासाठी त्यांना खास ट्रेनिंगही दिलेली असते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.