औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण, बघा व्हिडीओ..

औरंगाबादमध्ये निवडणुकीच्या काळात नेहमीच संवेदनशील वातावरण असते. याचीच प्रचिती आज आली. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात जोरदार राडा झाला.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची हि घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर एमआयएमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मौलाना यांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारामुळे कटकटगेट भागात प्रचंड तणावाचे वातावरण असून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे पाचशेहून अधिक समर्थक रस्त्यावर ठिय्या मारून बसले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

कदीर मौलाना आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात आधी वादावादी आणि नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी इम्तियाज जलील यांचे कपडे देखील फाटले. त्यानंतर मोठा तणाव निर्माण होऊन जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. पोलीसांनी तात्काळ जमावाला लाठीचार्ज करून पांगवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. दरम्यान, इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची माहिती कळताच एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कटकटगेट भागात दाखल झाल्याने वातावरण अधिकच तापले होते.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.