सेलेब्रिटी त्यांच्या आयुष्यात अनेक कष्ट झेलून यशाच्या शिखरावर पोहचतात. यश मिळालं तरी ते टिकवणं त्यांच्यासाठी सोपं काम नसतं. सेलिब्रिटींना खूप स्ट्रगल करावं लागत. बॉलीवूड मध्ये असे अनेक सेलेब्रिटी आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वाने नावारूपास आलेले आहेत. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना चाहता वर्ग देखील खूप मोठा असतो.
आपल्या चाहत्यांशी जास्तीत जास्त संवाद करण्याचा प्रयत्न ते करत असतात. बऱ्यापैकी सर्वच सेलेब्रिटी आजकाल सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आपल्या चाहत्यांशी संवाद साधता येतो. तसेच ते स्वत:चे फोटो, व्हिडीओ शेअर करत आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांशी शेअर करत असतात.
हे नियमित अपडेट करताना अनेकदा ते ट्रोल देखील झालेले बघायला मिळतात. चाहते असो किंवा विरोधक कोण कधी त्यांना ट्रोल करेल हे सांगता येत नाही. कधी कधी सोशल मीडियावर सेलिब्रिटींना अश्लील टिपणीचा सामना देखील करावा लागतो. अनेकांना असे अनुभव आले आहेत.
नुकताच अहा अनुभव अभिनेत्री इलियाना डिक्रूजला आला आहे. इलियानाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लाईव्ह येण्याचं ठरवलं. तिने ‘अस्क मी एनिथिंग’ विषय घेऊन लाईव्ह येण्याचं ठरवलं. पण तिला कुठे कल्पना होती कि इथे तिला काही टवाळखोरांचा पण सामना करावा लागू शकतो.
तिच्या या लाईव्ह सेशनमध्ये तिला एकाने असा प्रश्न विचारला जो वाचून तिची सटकली आणि तिने त्याला तिथंच सडेतोड उत्तर देखील देत विषय मिटवला. या चाहत्याने तिला विचारले कि तू कोणत्या वयात आपली व्हर्जिनिटी गमावलीस?
या प्रश्नाचे उत्तर देताना तिने त्याला चांगलेच फैलावर घेतले. ‘ दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसण्याची एवढी हौस कशासाठी? या प्रश्नाचं तुझी आई काय उत्तर देईल?’ असा प्रतिप्रश्न तिने केला. तिने दिलेले हे उत्तर ऐकून तो चाहता चुकूनही पुन्हा असं विचारायचं धाडस करेल असं वाटत नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.