नेहरु आणि मोदी ! दोन वेगवेगळ्या काळातील प्रधानमंत्री आणि दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते ! त्यांच्यामधील फरक शोधायला गेलं तर आपल्याला भरपूर गोष्टी सापडतील. परंतु या दोघांमध्ये काही समानताही आहे, ज्यामध्ये सतत नेहरुंवर टीका करणारे मोदी काही गोष्टींमध्ये नेहरूंचेच अनुकरण करताना दिसतात. आम्ही असेच हवेत बाण चालवत नाही, काही फॅक्टसच्या आधारे हे बोलत आहोत. आम्ही केवळ भूतकाळ आणि वर्तमानकाळातील गोष्टींमधील समानता दाखवत आहोत. चला तर पाहूया…
१) फॅशन : असे म्हटले जाते की “इतिहास अपने आप को दोहराता है” आणि “फॅशन लौटकर वापस आती है.” पूर्वी नेहरु जॅकेट म्हणून प्रसिद्ध असणारी फॅशन आता मोदी जॅकेट नावाने प्रसिद्ध आहे.
२) उत्तर-पूर्व भारतीयांवर प्रेम : नेहरूंप्रमाणेच मोदी देखील उत्तर-पूर्व भारतातील लोकांविषयी मनामध्ये चांगल्या भावना ठेवतात. ईशान्य भारत भेटीदरम्यानचे दोघांचे फोटो आणि डोक्यावर घातलेले टोप पाहिल्यानंतर आपल्याला हे सहज लक्षात येईल.
३) नियती : भारताच्या इतिहासात दोन संदेश कोरले गेले. भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला नेहरूंनी सांगितलेला “नियतीशी करार” आणि मोदींनी नोटबंदीच्या आदल्या रात्री दिलेला संदेश ! या दोन्ही प्रसंगी दोघांच्या तोंडून निघालेले एक वाक्य समान होते, “At the stroke of midnight…” म्हणजेच “आज रात्री बारा वाजल्या नंतर…”
४) वाघ दर्शन : नेहरू आणि मोदी दोघांनाही प्राण्यांवर प्रेम असल्याचे पाहायला मिळते. पण यामध्ये थोडाफार फरक करता येऊ शकतो. हातच्या काकणाला आरसा कशाला ? तुम्हीच हे फोटो पाहून ठरवा…
५) वल्लभभाई पटेल पुतळा : सरदार पटेल उप-प्रधानमंत्री असताना १९४९ मध्ये त्यांचा पहिला पुतळा उभा करण्यात आला होता, ज्याचे उदघाटन नेहरूंनी केले होते. २०१८ मध्ये मोदींनी सरदार पटेलांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी”चे अनावरण केले होते.
६) योगा : योगासनांबाबत नेहरू आणि मोदी या दोघांना विशेष आवड असल्याचे बघायला मिळते. नेहरूंचे शीर्षासन करतानाचे फोटो आणि मोदींचे शवासन करतानाचे फोटो पाहून आपणही दोघांच्या योग प्रेमाचे अनुकरण करायला हरकत नाही.
७) फेक न्यूज : फेक न्यूज बद्दल बोलायचे झाले तर नेहरू आणि मोदींच्या बाबतीत कुणाचा नंबर लागेल हे ठरवणे अवघड आहे. नेहरूंच्या बाबतीत निगेटिव्ह तर मोदींच्या बाबतीत पॉझिटिव्ह फेक न्यूज सर्रास बघायला मिळतात.
८) क्रिकेट : क्रिकेट हा भारतातील एक धर्मच मानला जातो आणि धर्म हा भारतातील राजकारणाचा एक केंद्रबिंदू मानला जातो. अशामध्ये एका बाजूला नेहरू हातात बॅट घेऊन मैदानात उतरले असताना मोदी तरी मागे का राहतील हे हा फोटो पाहून आपण म्हणू शकतो.
९) साहित्य : नेहरुंनी “डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्प्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर” सारखे साहित्य लिहले. तर दुसऱ्या बाजूला मोदींनी “एक्झाम वॉरियर्स, अ जर्नी, ज्योतिपुंज” सारखे साहित्य लिहले.
१०) नेहरु चाचा आणि मोदी काका : पंडित नेहरु देशातील सर्व लहान मुलांसाठी चाचा नेहरु होते. त्यांचा जन्मदिन “बालदिन” म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या बाजूला जनसत्ताच्या बातमीनुसार मोदींच्या वाढदिवसादिवशी लहान मुलांनी शुभेच्छा देताना त्यांना “काका” म्हणून हाक मारली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.