हिजडे शब्द असा तयार झाला का ?

हिजडे ! तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडर ! स्त्री आणि पुरुष अशीच समाजव्यवस्था असणाऱ्या जगात समाजाने वाळीत टाकलेला वर्ग ! बाजारात, दुकानात, स्टॅण्डवर पैसे मागुन स्वतःचा चरितार्थ चालवणारा एक समाजघटक ! नाना पाटेकरच्या क्रांतिवीर चित्रपटातील “साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है” किंवा “मै हिजडे की जिंदगी जिना नहीं चाहता” अशा डायलॉगमुळे आपल्या मनात एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेला व्यक्ती ! पण आपल्याला माहित आहे का, की त्यांना हिजडे असा शब्द कुठून आला ? फेसबुकवर या आशयाची एक पोस्ट वाचण्यात आली होती. आपल्या माहितीसाठी ती इथे देत आहे.

पोर्तुगीजांनी लग्नाची रुमालघडी म्हणुन मुंबई बेटे इंग्रजांकडे सुपूर्द केली. यथावकाश मुंबई बंदराचा विस्तार होऊन शहरीकरण झाले. बंदर म्हणून मुंबई जगभरातील नाविकांचे आकर्षण झाले. बंदराची भरभराट होऊ लागली. भरभराटीच्या काळात ज्यास ग्रँट रोड म्हणतात तो परिसर सुद्धा भरभराटीस आणि नावारुपाला आला. प्रत्येक सोमवारी तिथे सकाळी विशेष बाजार भरायला लागला. धक्क्याला लागलेल्या बोटींवरची प्रभु येशूची कोकरं रविवारी जीवाची बॉम्बे करण्याच्या नादात कफल्लक होत असत आणि सोमवारी सकाळी हँगओव्हर उतरलेला असे तेंव्हा त्यांना नौकेवर परतीची आठवण व्हायची ! मग त्यासाठी अंगावर जे उरलंसुरलं असेल ,ते ग्रँट रोडवर विकून परतीच्या प्रवासाला लागायचं अशी प्रथाच पडून गेली.

आजही सोमवारी सकाळी ग्रँट रोडला बाजार भरतो ! या सकाळच्या बाजारात अनेक खरेदीदार यायचे. त्यांची उलाढाल बघून तिथं तृतीयपंथीय सुद्धा मागतीला येऊ लागले ! हळूहळू त्या सोमवारच्या बाजारात लिंगव्यंग असणाऱ्यांची संख्या आणि धामधूम वाढू लागली. ते वसुली करु लागले. इथं येणाऱ्या स्त्रीवासनी पुरुषदेहीना त्या तृतीयपंथींना नेमकं काय म्हणायचं हे कळत नव्हतं. तेंव्हा कुणीतरी या सोमवारच्या बाजारच्या दिवसाला ‘HIS DAY’ (हिज डे अर्थात त्यांचा दिवस) असा शब्द योजिला ! आणि तेंव्हापासून दोन शब्द असलेला शब्द ‘हिजडे’ असा रुढ झाला !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.