टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, टोल वसुली यंत्रणेकडून होणारा त्रास आपल्याला नवीन नाही. पण हे सगळं टाळता आलं तर किती बरं होईल ! आपला वेळ आणि मानसिक त्रास वाचेल. आपली ही इच्छाही पूर्ण होणार आहे, कारण फास्टॅग प्रणाली आली आहे. त्याची सुरुवात २०१४ मध्येच झाली होती.
डिसेंबर २०१७ नंतर विकल्या गेलेल्या नवीन गाड्यांना फास्टॅग लावण्यासाठी १५ डिसेंबर २०१९ ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विना फास्टॅग एखादी गाडी ETC रांगेत घातल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे. पाहूया काय आहे ही फास्टॅग प्रणाली आणि ती कशी वापरायची..
काय आहे फास्टॅग प्रणाली ?
फास्टॅग ही वाहनधारकांकडून टोल गोळा करण्याची आधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. फास्टॅगच्या मदतीने आपण टोलनाक्यावर विनाथांबा टोल भरु शकतो. त्यासाठी आपल्या गाडीच्या समोरच्या बाजूला हा फास्टॅग लावावा लागतो. आपली गाडी टोलनाक्यावर आल्यानंतर तिथे लावण्यात आलेला रेडिओ फ्रिक्वेन्सी सेन्सर गाडीवरचा फास्टॅग वाचेल आणि गाडीच्या मालकाच्या खात्यातून टोलचे पैसे कापले जातील. तसा एसएमएस आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल.
कुठे मिळतो हा फास्टॅग ? काय कागदपत्रे लागतात ?
हा फास्टॅग नॅशनल हायवेज अथॉरीटी ऑफ इंडियाच्या टोलनाक्यावर, SBI, ICICI, HDFC, Axis बँकांच्या ठराविक शाखा, PayTM सारखी ऑनलाईन पोर्टल, पेट्रोल पंप, NHAI च्या My FASTag यावर मिळू शकेल. फास्टॅगसाठी आपल्या गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र, गाडीच्या मालकाचा फोटो, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, गाडीच्या मालकाची KYC प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात. ही कागदपत्रे सादर करुन आपण उपरोक्त दिलेल्या ठिकाणी फास्टॅग मिळण्यासाठी मागणी करु शकता.
फास्टॅग कसा वापरायचा ?
फास्टॅग मिळाल्यानंतर स्टिकरप्रमाणे त्याचा मागचा भाग काढून तो फास्टॅग गाडीच्या पुढच्या काचेच्या मधोमध वरच्या बाजूला लावावा. फास्टॅग लावण्यासाठी इतर डिंक वगैरे साधें वापरु नका. फास्टॅग काचेवर बसत नसेल तर तो बदलून घ्या. १५ डिसेंबर पर्यंत गाडीला फास्टॅग लावला नाही, तर टोलनाक्यावर तुम्हाला जलद ETC लेनमध्ये प्रवेश करता येणार नाही. चुकून केलाच तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. तुमच्यासाठी हायब्रीड लेन सुरु असेल. पण तिथे रांगेत जाऊनच रोख टोल भरता येईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.