आजही भारतात कुंडली जुळल्याशिवाय लग्न होत नाही. राशीचा विचार केल्या जातो गुण जुळतात का ते बघितले जातात. चला आज बघूया कोणत्या राशीवाले पुरुष अथवा स्त्री लवकर प्रेमात पडते खासरे वर
मिथून राशी
ज्योतिष्य शास्त्रनुसार मिथुन राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात. या लोकांबाबत असे म्हटले जाते की, या लोकांसोबत जर कुणी चांगल्याने बोललं तर, हे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे लोक एकतर्फ़ी प्रेमात लवकर पडतात. या लोकांच्या प्रेमाबाबत सांगितलं जातं की, या राशीचे लोक आपल्या पार्टनर सोबत एकनिष्ठ नसतात.
कर्क राशी
कर्क राशींच्या लोकांबाबत बोललं जातं की, हे लोक आपल्या जोडीदाराप्रती एकनिष्ठ व विश्वासू असतात. हे लोक ज्यांच्यावरही प्रेम करता ते प्रेम ते इमानदारीने निभवतात. या लोकांशी जे लोक चांगले बोलतात ते लोक या राशीच्या लोकाना पसंत पडतात. तसेच, आपल्या पहिल्या प्रेमाला विसरणे या लोकांना अवघड असत.
कन्या राशी
या राशीचे लोक आपल्या पार्टनरपासून काहीही लपवत नाहीत. परंतु हे लोक हि अपेक्षा करतात कि त्यांच्या जोडीदाराने सुध्दा त्यांच्या पासून काहीही लपवू नये. या राशीचे लोक मुक्त विचाराचे असल्यामुळे अनेकदा हे फसतात. तसेच प्रेमभंग जास्त प्रमाणात या राशीच्या लोका सोबत होतो.
कुंभ राशी
कुंभ राशीचे लोकांना नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहण्यात आनंद मिळतो. लोकांनी यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना चांगलं वाटत नाही. जे लोक यांचं ऎकतात त्यांच्याशी यांचं चांगलं पटतं. त्यांच्या वर लोकाचे ध्यान नसल्यास त्यांना रागही लवकर येतो.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांबाबत म्हटलं जातं की, हे लोक स्वभावाने भोळे असतात. त्यामुळे हे लोक कुणाच्या बोलण्यात येतात. कुणीही यांना बोलण्याने फसवू शकतं. या लोकांना स्वत:चं कौतुक ऎकणं आवडतं. त्यामुळे आपली रास हि असेल तर या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे.