ही घटना ८ ऑगस्टची आहे. एक महिला दिल्ली वरुन मिडल ईस्टला निघाली होती. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिची फ्लाईट होती. तेवढ्यात एअरपोर्ट वरील अधिकाऱ्यांना एक कॉल आला.
अधिकाऱ्यांना सूचना मिळाली एक “फियादीन” महिला बॉम्बस्फोट करणार आहे. अधिकारी चिंतेत पडले. त्यांनी त्वरित सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्याचे आदेश दिले. त्यांनी तपास सुरु केला. पण नंतर जे सत्य समोर आले, त्याने सगळ्यांचं डोकं फिरलं.
काय होतं ते वास्तव ?
वास्तवात ती महिला फियादीन नव्हती. तो कॉल तिच्याच पतीने केला होता. का ? नवरा बायकोची भांडणे दुसरं काय असणार ! त्याची पत्नी नोकरी करण्यासाठी भारत सोडून मिडल ईस्टला निघाली होती आणि या नवरोबाला काही करून तिला थांबवायचं होतं. नसिरुद्दीन असं त्या नवरोबाचं नाव असून राफिया ही त्याची पत्नी ! दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीच्या बवाना इलाक्यातून नसिरुद्दीनला अटक केली आहे.
हे असं घडलं
बातमीनुसार नसिरुद्दीनची चेन्नईमध्ये पिशव्या बनविण्याची फॅक्टरी आहे. राफिया त्याच कंपनीत काम करत होती. तिथेच तिची आणि नसिरुद्दीनची ओळख झाली आणि दोघांनी लग्न केले. राफियाला आखाती देशात नोकरी करण्याची इच्छा होती, म्हणून तिने भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
नसिरुद्दीनने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्याचे ऐकले नाही. ८ ऑगस्टला तिची फ्लाईट होती. नसिरुद्दीनने प्लॅन केला आणि विमानतळावरील अधिकाऱ्यांना तिच्याबद्दल खोटी माहिती दिली.
फियादीन म्हणजे काय ?
फियादीन हल्ला ही दहशतवाद्यांकडून वापरली जाणारी एक रणनीती आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये एक फियादीन सहभागी असतो. तो एकदम सर्वसाधारण स्त्री किंवा पुरुषासारखा दिसतो. परंतु त्यांच्या संपूर्ण शरीराला बॉम्ब, शस्त्रे लावलेली असतात. हे सगळं शरीरावर गुप्तपणे घेऊन ते वावरत असतात.
थोडक्यात मानवी बॉम्बही त्यांना म्हणता येईल. हे सर्वसाधारण दिसणारे फियादीन लोकांच्या गर्दीत मिसळतात. सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी लक्ष करून हे आपल्या घातपाती कारवाया पार पाडतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.