सोशल मिडीयावर सक्रीय असणारे असे फार कमी लोक आहे ज्यांना हिंदुस्तानी भाऊ यांचा बद्दल माहिती नसेल. हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हिडीओ करिता मोठ्या प्रमाणात युट्युब आणि फेसबुक वर प्रसिद्ध आहे. भारता विरोधात बोलणाऱ्याची हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हिडीओ मधून चांगला समाचार घेतो. भाऊला युट्युबवर तब्बल १२ लाख लोक फॉलो करतात.
विकास पाठक उर्फ बबलू पाठक असे त्याचे खरे नाव आहे. आणि भाऊ हा मराठी आहे तो मुंबई मध्ये राहतो. सध्या भाऊ हा बिग बॉस मध्ये आला आहे आणि आपल्या कामाने सर्वाचे मन जिंकत आहे. बिनधास्त स्वभाव आणि आपली बोलण्याची शैली याच्या मुळे भाऊ बिग बॉस मधील स्पर्धकांना देखील आवडत आहे.
भाऊचे पूर्ण नाव विकास जयराम फाटक हे आहे. भाऊचा आवडता अभिनेता संजय दत्त आहे. हावभाव, बोलणे आणि चालणे सर्व गुण त्याचे संजय दत्त यांच्या सोबत जुळताना आपल्याला दिसतात. विकासचा जन्म देखील मुंबईचा आहे.
प्रसिद्धी मिळवण्या आधी भाऊचे जीवन अनेक चढ उताराने भरलेले आहे हे आपणास बघायला मिळेल. भाऊच्या वडीलांची तो लहान असताना नौकरी गेली. फार कमी वयात भाऊवर कुटुंब सांभाळायची जवाबदारी आली. सुरवातीच्या काळात तो बारमध्ये वेटर होता नंतर त्याने रेल्वे आणि घरोघर अगरबत्ती देखील विकली. चायनीजच्या गाड्यावर देखील भाऊने काम केले आहे.
कमी वयात जवाबदारी वाढल्यामुळे भाऊ ने शिक्षण पूर्ण केले नाही. सोशल मिडीयावर एका मुलाखतीत भाऊ सांगतो तो ७ वी पुढे शिकला नाही. काही दिवसा नंतर तो मुंबई मधील एका स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करू लागला.
भाऊ ने आपला पहिला व्हिडीओ पुलवामा घटनेनंतर बनविला होता. भारताला युट्युबवर बरे वाईट बोलणाऱ्या लोकासाठी तो व्हिडीओ बनवितो आणि आपल्या भाषेत त्यांचा चांगला समाचार घेतो. पहली फुर्सत में निकल हा त्याचा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध आहे.
हिंदूस्तानी भाऊ हा साईबाबाचा मोठा भक्त आहे. भाऊ मुळे अनेक पाकिस्तानी युट्युबर ने आपले भारता विरोधी दुकान बंद केलेले आहे. भारतावर कोणी बोलेल त्याला असेच उत्तर मिळेल अस भाऊ बोलतो. आता बघूया भाऊ बिग बॉस मध्ये काय करणार.
संपूर्ण व्हिडीओ तुम्ही खाली बघू शकता..
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.