संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवार) ऐतिहासिक निकाल दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने दिलेल्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अयोध्येची वादग्रस्त जागा ही ‘रामलल्लाची’च असल्याचा निकाल कोर्टाने दिला. त्यामुळे या जागेवर आता राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुस्लिम पक्षकारांना पर्यायी जागा
सुप्रीम कोर्टाने यात मुस्लिम पक्षकारांनाही अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अयोध्येत मुस्लिम पक्षकारांना पर्यायी जागा मिळणार असून त्याचं नियोजन केंद्र आणि राज्य सरकार करणार आहे.
एकीकडे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्त लावण्यात आला होता तर या उलट महाराष्ट्रातील एका गावात घडले आहे. तेरखेडा येथील गावकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत आदर्श घालून देण्याचे काम केले आहे.
येरमळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडीत सोनवणे आणि तेरखेडा गावातील बिभीषण खामकर यांच्या पुढाकाराने अयोध्या प्रकरणाच्या कालाचे स्वागत म्हणून तेरखेडा गावातील हिंदू-मुस्लीम समाजातील लोकांनी गावात गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला. विशेष म्हणजे गावातील सर्वच समाजातील लोकांनी यात सहभाग घेत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले.
एक हजारपेक्षा अधिक गावकऱ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. न्यायालयाचा निकाल काही असला तरीही तो आपल्याला मान्य असून, नेहमीप्रमाणे गावातील लोकं एकजूटीने सोबत राहतील. असे सुद्धा यावेळी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या गावाने एक वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवला असल्याचे बोलले जात आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.