१ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा अस्तित्त्वात आला आहे. तेव्हापासून लोकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल व्हायला सुरवात झाली आहे. लोकांना इतका दंड होतोय की अक्षरशः कर्ज घेऊन भरावा लागेल. सगळ्यात पहिली बातमी आली ती हरियाणाच्या गुरुग्रामची !
ज्या व्यक्तीच्या स्कुटीची किंमतच १५ हजार रुपये आहे, त्या व्यक्तील ट्रॅफिक पोलिसांनी २३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनतर दुसरी बातमीही गुरुग्राममधूनच आली. एका व्यक्तीला एका नव्हे तर दहा नियमांचा भंग केल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांनी तब्बल ५९ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
त्यानंतर राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरने चक्क १,४१,७०० रुपयांची पावती फाडली. ५ सप्टेंबर रोजी ट्रकची वाहतूक करताना वाहतूक पोलिसांना हा ट्रक ओव्हरलोडिंग असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे, पोलिसांनी नवीन मोटार वाहन कायद्यानुसार या ट्रक चालकाडून दंडाची रक्कम वसुल केली. त्यानुसार, ट्रक चालकाने ९ सप्टेंबर रोजी रोहिनी कोर्ट येथे तब्बल १ लाख ४१ हजार ७०० रुपये दंड भरला होता.
१ लाख ४१ हजार ७०० रुपये दंड हा सर्वात मोठा दंड ठरला होता. पण आता एका पट्ठ्याने हा रेकॉर्ड देखील तोडला आहे. आणि अनेक वाहतुकीचे नियम तोडून आतापर्यंतची सर्वात मोठी पावती फाडली आहे.
ओडिशामध्ये आतापर्यत सर्वात मोठे पावती फाडण्यात आल्याचे हे प्रकरण समोर आले आहे. ओडिशामध्ये शैलेश शंकर लाल गुप्ता या ट्रक चालकाला ओडिशातील वाहतूक परिवहन विभागाने तब्बल ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे.
शंकर गुप्ता हे अनेक वर्षांपासून ट्रक चालवतात. मागील पाच वर्षात त्यांनी अनेकदा ध्वनी आणि वायू प्रदुषण, विना परवाना गाडी चालविणेसह सामान्य नियमांचे उल्लंघन केले. पण त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की हे नियम मोडणे त्यांना एवढं महागात जाईल.
नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येत आहे. हे शंकर गुप्ता यांना चांगलंच महागात पडलं आणि तब्बल ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड त्यांना भरावा लागला.
महाराष्ट्रात या नव्या कायद्याला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात या कायद्याला तूर्तास स्थगिती दिल्याचं जाहीर केलं होतं.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.