हिवाळ्यातील उन्हाचे चमत्कारिक फायदे एकदा अवश्य वाचा…

वातावरणात होणाऱ्या बदलासोबत तुमचा मूड तर बदलत नाही ना? म्हणजे थोड्या-थोड्या गोष्टीवरून राग येणे, अचानक उदास होणे, चिडचिडेपणा या गोष्टी तर तुमच्या वागण्यात वाढल्या नाहीयेत ना? जर होत असेल तर हे SAD म्हणजेच Seasonal Affective Disorder या समस्येचे लक्षणे आहेत. हिवाळ्यात ऊन कमी झाल्यावर या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये उन्हात उभे राहणे आवश्यक असते.

मेंदुवर वाईट परिणाम-

SAD हे एक प्रकारचे डिप्रेशन आहे जे कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. यादरम्यान कामात मन न लागत नाही आणि निराशेचे भाव मनात येतात. विशेषज्ञांच्या मते हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्याने याचा आपल्या शरीराच्या क्रिया, बॉडी क्लोक आणि तब्येतीवर सुद्धा परिणाम होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांवर याचा जास्त परिणाम होतो. सोबतच अन्य प्रकारचे बायपोलर डिप्रेशन होते त्यात SAD ची समस्या होण्याचा जास्त धोका असतो.

या समस्या होतात-

थंडीमध्ये मेंदूचे कार्य जास्त असल्याने मूड आणि झोपण्याचा पॅटर्न नियंत्रित करणारा मेलाटॉनिन हार्मोन असंतुलित होतो त्यामुळे या समस्या उद्भवतात. तसेच सेराटॉनिन न्यूरोट्रान्समीटरच काम करते. जे की सूर्याच्या प्रकाशात सक्रिय होते. परंतु हिवाळ्यात सूर्याचा प्रकाश कमी असल्याने हे रसायन कमी प्रमाणात सक्रिय होते ज्यामुळे लोकांना डिप्रेशनची समस्या जाणवते. सूर्याची किरणे अंगावर पडल्याने मेंदूत हायफोथैलेमसचा भाग उत्तेजित होऊन आपली झोप, मूड आणि भावना नियंत्रित होतात.

डिप्रेशन पासून असा करा बचाव-

सारखं क्रियाशील राहिल्याने आपल्या शरीरात आवश्यक असणाऱ्या केमिकल्सचा स्त्राव सुरळीत होतो आनी डिप्रेशन कमी होते. दररोज 30 मिनिट पर्यंत वॉक किंवा व्यायाम लाभकारक असतो. जिमला जाण्यास शक्य नसेल तर एक्सरसाईज सुद्धा लाभदायक आहे. याशिवाय जे व्यक्ती आपला जास्त वेळ घर किंवा ऑफिसमध्ये घालवतात त्यांनी थोडावेळ उन्हात बसायला हवे. खाण्यापिण्यात व्हिटॅमिन सी आणि डी जास्त येईल याची काळजी घ्यावी. यामुळे डिप्रेशन कमी होण्यास मदत मिळते. जितका जास्त शक्य होईल तितका वेळ परिवार आणि नातेवाईकांसोबत घालवावा. बऱ्याच वेळा मेडीटेशन ने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुरळीत होऊ शकते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
मोस अथवा चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय
चेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.