ठाण्यातील नौपाडा भागामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाला एका गुजराती व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या मारहाणीच्या घटनेला ५ दिवस उलटूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती.
लिफ्टचा दरवाजा अर्धवट उघडा राहिल्याचा शुल्लक कारणावरून राहुल पैठणकर आणि त्यांच्या कुटुंबियांना हसमुख शहा आणि त्याच्या मुलाने अमानुष मारहाण केली होती.
मारहाण करणाऱ्या या हसमुख शहाला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या मारहाण करणाऱ्या हसमुख शहाने महाराष्ट्रातील मराठी जनतेची कान पकडून माफी मागितली आहे. अविनाश जाधव यांनी त्याचा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.
Ekach no. Kaam saheb Yana layki dakhvalich pahije Jay Maharashtra