ठाण्यातील नौपाडा भागामध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबाला एका गुजराती व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घटना घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या मारहाणीच्या घटनेला ५ दिवस उलटूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती.
लिफ्टचा दरवाजा अर्धवट उघडा राहिल्याचा शुल्लक कारणावरून राहुल पैठणकर आणि त्यांच्या कुटुंबियांना हसमुख शहा आणि त्याच्या मुलाने अमानुष मारहाण केली होती.
मारहाण करणाऱ्या या हसमुख शहाला मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चांगलाच धडा शिकवला. मारहाण करणाऱ्या हसमुख शहाने महाराष्ट्रातील मराठी जनतेची कान पकडून माफी देखील मागितली. अविनाश जाधव यांनी त्याचा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला होता.
याच हसमुख शहाबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याने यापूर्वीही एका महिलेचा जीव घेतला असून त्याला याप्रकरणी अटक झाली होती. आपल्या भरधाव मर्सिडीजने रिक्षाला धडक दिल्यानंतर एका महिलेलाही ठोकर दिल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता.
नुकतीच मी महिन्यात हि घटना घडली होती. घोडबंदर रोडवरील पानखंडा गावातील रिक्षाचालक प्रवीण भागीवले (२७) मंगळवारी सायंकाळी ५ वाजता रिक्षातून उमेमा दाऊदी लोदकर (३४, रा. ओवळा नाका) यांना घेऊन निघाले होते. ओवळा येथे उजव्या बाजूकडे वळण घेत असताना घोडबंदरकडून ठाण्याकडे भरधाव येणाऱ्या मर्सिडीजने आधी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. नंतर याच रिक्षाच्या बाजूला उभ्या असलेल्या वंदना भगत (४४ रा. पानखंडा गाव) यांनाही गाडीने जोरदार धडक दिली होती.
तरीही कार थांबली नाही. गाडीने भागीवले यांच्या रिक्षाला डाव्या बाजूने ठोकर दिली. यामुळे पुढे असलेल्या रिक्षालाही धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वंदना यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर हसमुख शाहविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी अटकही केली. नंतर त्याला जामीन मिळाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.