कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर” या कार्यक्रमातील अनेक जोरदार परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले बघायला मिळत आहेत. या शोच्या टीआरपी मध्ये भरघोष वाढ झालेली दिसत आहे. छोट्या बच्चे कंपनीने आपल्या सुरांनी सर्वाना भुरळ घातली आहे.
या शो मधील मागच्या आठवड्यात हर्षद नायबळने गायलेलं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. आतापर्यंत हजारो जणांनी हा व्हिडिओ शेअर केला असून लाखो लोकांनी बघितला आहे.
माऊली या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमाची संपूर्ण टीम या कार्यक्रमामध्ये आली होती. अभिनेता रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधवसहीत अभिनेत्री संयमी खेर हे यावेळी उपस्थित होते. हर्षदची आई देखील हा कार्यक्रम बघण्यासाठी औरंगाबाद वरून आली होती.
‘हंबरून वासराले चाटती जवा गाय’ ही कविता हर्षदने खूप छान तालासुरात सादर केली. हि कविता सादर करताना हर्षद भावुक झाला. मंचावर त्याचे डोळे भरून आले आणि तो रडायला लागला. हर्षलसह रितेश देशमुख आणि अवधूत गुप्ते देखील यावेळी भावूक झाला.
बघा हर्षदने गायलेली ‘हंबरून वासराले चाटती जवा गाय’ कविता-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…