1994 साली बिहारमध्ये 4000 उपनिरीक्षकांच्या जागा निघाल्या होत्या त्यापैकी 1100 विद्यार्थी हे रहमान च्या क्लासेस चे होते.तेव्हा पासून तो प्रसिद्ध झाला.
लक्षात ठेवा: एक पुस्तक, एक पेन, एक मूल, आणि एक शिक्षक जगाला बदलू शकतात. ”
-मलाला युसुफझाई
आदम्या अदिती गुरुकुलच्या हजारो विद्यार्थ्यांना उपनिरीक्षक, आयएएस, आयपीएस, आयआरएस,सीटीओचे अधिकारी बनविले आहे. रहमान हे एक असे शिक्षक आहेत की त्यांनी कित्येकांचे जग बदलवले आहे.
डॉ. मोतीउर रहमान खान यांनी 1994 मध्ये कोचिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली कारण ते प्रेमात पडले होते.
अमिता [त्यांची पत्नी] आणि मी कॉलेजमध्ये प्रेमात पडलो आणि तिला प्रभावित करण्यासाठी मी बनारस हिंदू विद्यापीठात एम.ए. ला प्रथम आलो होतो. पण तो काळ वेगळा होता,त्या वेळी हिंदू-मुस्लिम विवाह निषिद्ध मनाला जात होता. आमच्या पालकांच्या संमतीशिवाय आम्ही लग्न केले.आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितले की आमच्यापैकी कोणीच आपला धर्म बदलणार नाही आणि समाजाला ह्या गोष्टी मान्य नसल्यामुळे आमच्यावर समाजाने/प्रत्येकाने बहिष्कार टाकला आणि त्यामुळं मला कुठेही नोकरी मिळू शकली नाही. ”
रहमानने आपल्या लहान भाड्याच्या खोलीत शिकवणी वर्ग सुरु केले तिथं विद्यार्थी खालीच जमिनीवर बसत असत.पोलीस निरीक्षकांचा मुलगा असल्याने त्यांना नेहमी आयपीएस अधिकारी व्हायचे होते. ते बऱ्याच स्पर्धात्मक परीक्षांसाठी पात्र झाले होते व त्यापैकी काही परीक्षा उत्तीर्ण देखील केल्या होत्या,म्हणून त्यांनी यूपीएससी, आयएएस आणि बीपीएससी आणि लिपिक पदांच्या परीक्षा यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणास सुरुवात केली. 1994 साली बिहारमधील 4000 उपनिरीक्षकांची भरती करण्यात आली त्यापैकी 1100 विद्यार्थी रहमानच्या वर्गातून होते. नंतर रहमान हे नाव बिहारमधील सर्वांनाच परिचित झाले आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या क्लासेस ला विद्यार्थी येत असत.
आणखी एक घटनेने रहमान चा कोचिंग क्लासेस कडे बघण्याचा दृष्टीकोन बदवला. एकदा एक विद्यार्थी थोडं मार्गदर्शन मिळावं म्हणून आला होता आणि त्याच्याकडे क्लासेससाठी पुरेसे पैसे नव्हते,पण रहमानला तो मुलगा हुशार दिसला आणि त्याला त्याच्या क्लासेसला यायला सांगितले. वडील नसलेल्या त्या मुलाला राहमानने क्लासेस साठी फक्त 11 रुपये देण्याचे सांगितले. हा विद्यार्थी शादीक आलम आता तो ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे.
यानंतर, रहमान ने गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना फक्त 11 रुपयात प्रशिक्षण देणे चालू केले. ते विद्यार्थ्यांना विचारून त्यांना परवडेल तेवढेच पैसे घेत.
रहमान म्हणतात की,”माझ्या अकॅडमीत 10,000 हून अधिक विद्यार्थी शिकले आहेत. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार पैसे देतो. कोणीही कधीही मला फसविले नाही.”
2007 पर्यंत रहमानला गुरु रहमान म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी अकादमीला त्यांच्या मुलीचे आदम्याअदिती गुरुकुल असे नाव दिले. रहमान आणि अमिता धार्मिक सलोखायचे आदर्श बनले आहेत कारण त्यांनी त्यांच्या मुलांच्या नावानंतर चे आडनाव काढून टाकले, आदम्या अदिति आणि अभिज्ञान अरजित.
गुरुजींच्या क्लासेस मध्ये एक वेगळेपणा आहे तो असा की, ते सतत आपल्या वडिलांप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतात, जे आपल्यासारख्या आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप महत्वाचे ठरते. बिहारमधील मोहनिया येथे कलेक्टर मुकेश चौधरी म्हणतात, “कोणीही त्यांच्या सारखा इतिहास शिकवूच शकत नाही.”
आणखी एक विद्यार्थी, मीनु कुमारी झा,जी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील निवृत्त प्राथमिक शाळेतील शिक्षकाची मुलगी आहे. तिला आयपीएस अधिकारी व्हायचे होते आणि आज ती एक आयपीएस अधिकारी आहे.
ट्रिपल एमए आणि प्राचीन इतिहास आणि संस्कृतीत पीएचडी झालेले, गुरु रहमान यांनी आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले आहे, त्यापैकी 3,000 विद्यार्थी सब इन्स्पेक्टर, 60 आयपीएस अधिकारी आणि 5 आयएएस अधिकारी आणि बर्याच इतर शासकीय पदांवर आहेत.
रहमान सध्या सुमारे 2000 विद्यार्थ्यांना शिकवतो आहे.आणि हे विद्यार्थी एक टीम तयार करून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी काम करतात.
रेहमानच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बरेच उपक्रम केले त्यामध्ये अवयव दान, गंगा घाट स्वच्छ करणे आणि अपंग असलेल्या अनुराग चंद्र ला दिल्लीच्या ते लेहपर्यंतच्या तीन चाकी सायकलवरून प्रवास करण्याकरिता विविध निधी उभारला.
बिहारव्यतिरिक्त मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील विद्यार्थीदेखील येथे येतात आणि प्रशिक्षण घेतात.आणि तेही 11 रु. ते 100 रु. दरम्यान पैसे देऊन. एकदा का विद्यार्थी यशस्वी पदांवर पोहचला की, तो अकादमी आणि सामाजिक कार्यांतील संस्थांना दान देतात.
आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे आणि त्यामुळं आपण कुठल्याही जात, पंथ, धर्म किंवा सामाजिक स्थितीचा विचार न करता प्रत्येकासाठी परवडेल अस शिक्षण उपलब्ध करून दिल पाहिजे. ज्यांना माझ्या मदतीची आवश्यकता आहे अशा वंचित तसेच गरजू विद्यार्थ्यांना मी आमंत्रित करतो. ”
तुम्ही आदम्याआदिती गुरुकूला भेट देऊ शकता,पहिला मजला, गोपाल मार्केट, नया तोला, भीखना पहारी, सेंट्रल बँक एटीएम, पटना, बिहार 800004
किंवा 09334107690/9304769416 वर कॉल करा.
तुम्ही मेल सुद्धा करू शकता- targetcivilservices.munna.ji@gmail.com
हि खासरे माहिती आपल्यास आवडल्यास नक्की शेअर करा..
वाचा जळगाव कन्या ते आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील
Comments 2