आपल्या परिचयाच्या कुणी नवीन गाडी घेतल्यानंतर त्या गाडीला VIP नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. त्यासाठी लागतील तेवढे पैसे मोजायचीही त्यांची तयारी असते. असे गाडीला गोल्डन नंबर घेण्यामागचे त्यांचे उद्देश्य वेगवेगळे असतात.
कुणी त्या नंबरपासून दादा, भाऊ वगैरे नावे बनवतात तर कुणी आपला लकी नंबर म्हणून किंवा वेगळी ओळख म्हणून गोल्डन नंबर घेतात. गोल्डन नंबरसाठी RTO ऑफिसकडून वेगवगेळे दरही आकारले जातात.
VIP नंबर पडला १९ लाखांना
गुजरातच्या राजकोटमध्ये राहणाऱ्या गोविंद प्रसन्ना नावाच्या एका बिल्डरला गोल्डन नंबरचा नाद चांगलाच महागात पडला आहे. “०००७” हा नंबर गुजराती भाषेत लिहल्यानंतर तो भगवान गणेशासारखा दिसतो.
या गोल्डन नंबरला जास्त मागणी असल्याने आरटीओने लिलाव पद्धतीने हा नंबर वितरित करण्याचे ठरवेल. त्यानुसार गोविंद प्रसन्ना यांनी १९ लाख रुपयांची बोली लावून हा नंबर मिळवला. कुठल्याही नंबरसाठी गुजरातमध्ये आतापर्यंत लागेल ही सर्वात मोठी बोली आहे.
…आणि सगळे पैसे पाण्यात
गोविंद प्रसन्ना यांनी मोठ्या हौसेने आपल्या कारच्या नंबर प्लेटवर भगवान श्रीगणेशाची प्रतिमा बनवण्यासाठी “०००७” हा गोल्डन नंबर घेतला, पण त्यांची हौस त्यांना चांगलीच नडली. सोबतच या नंबरसाठी मोजलेले १९ लाख रुपयेही वायाच गेले असे म्हणावे लागेल.
झाले असे की भगवान गणेशाची प्रतिमा बनवण्यासाठी त्यांनी १९ लाख रुपये मोजून हा नंबर घेतला, पण आरटीओच्या अधिकाऱ्यांना त्यांना सांगितले की तुम्हाला नियमांविरुद्ध जाऊन गुजराती भाषेत गादीवर नंबर लिहता येणार नाही. झालं का कल्याण ? ज्या कामासाठी एवढे पैसे मोजले तेच होणार नसेल तर पैसे वायाच गेलं ना. स्वतः गोविंद प्रसन्ना म्हणतात की, “मी कोणी जेम्स बॉण्डचा फॅन नाही जे या नंबरसाठी एवढे पैसे खर्च करेल.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.