गोपीनाथगड (पांगरी) येथे मिळाली पंकजा मुंडे यांना धक्कादायक मतदान..

कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंसाठी प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक धाकधूक वाढवणारी ठरली आहे. कारण, पहिल्या फेरीपासूनच धनंजय मुंडेंनी घेतलेली आघाडी कमी झाली नाही. या बहिण-भावामध्ये निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद उफाळून आला होता. दोन्ही नेत्यांकडून प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला.

परळीत भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत शेवटचे दोन दिवस कथीत क्लीपभोवती फिरले. त्यानंतरही आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

सुरूवातीपासूनच धनंजय मुंडे हे आघाडीवर होते. त्यांनी पहिल्या फेरीत १ हजार मतांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रत्येक फेरीत धनंजय मुंडे हे आघाडी वर आपल्याला दिसत आहे.

गोपीनाथ गड हे या मतदार संघात केंद्रित राहलेला आहे. गोपीनाथ गड हे पांगरी गावात वसलेले आहे आणि या निवडणुकीत हे केंद्र राहलेले आहे. या गावाने लोकसभेवेळेस डॉ प्रीतम मुंडे यांना साथ दिली होती. परंतु या वेळेस चित्र पालटले आहे.

गोपीनाथ गड असलेल्या पांगरी गावातही धनंजय मुंडेंनी 800 मतांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे त्यांचं मूळ गाव नाथ्रामध्येही राष्ट्रवादीला 350 मतांची आघाडी मिळाली. नाथ्रा गावात कायमच धनंजय मुंडेंचं वर्चस्व राहिलंय.

मागील निवडणुकीत देखील हे गाव धनंजय मुंडे यांच्या सोबत होते. दरम्यान, परळीत अजूनही मतमोजणी सुरु असून उर्वरित टप्प्यांचे कलही लवकरच समोर येतील. धनंजय मुंडेंची आघाडी अशीच वाढत राहिल्यास पंकजांसाठी हा मोठा धक्का असेल.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायाल विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.