इंग्लंडच्या ऑक्सफर्डशायर शहरात ब्लेनहेम पॅलेस हे आठराव्या शतकातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्टन चर्चिल यांचा जन्म ब्लेनहेम पॅलेसमध्येच झाला होता. या पॅलेसमध्ये एक जगप्रसिद्ध कमोड होते. हे एखादं सामान्य कमोड नसून १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलं होतं.
हेच जगप्रसिद्ध कमोड आता चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक टोळी पॅलेसमध्ये घुसली आणि त्यांनी हे कमोड पळवलं.
सोन्याचा हा कमोड इटलीचे कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी तयार केला आहे. हा कमोड गुरूवारी सुरू करण्यात आलेल्या Victory is Not Option या प्रदर्शनाचा भाग होता.
या कमोडची किंमत जवळपास पाच मिलियन डॉलर म्हणजे ३५ कोटी रूपये होती. सोन्याचं कमोड चोरीच्या घटनेमुळं ब्लेनहेम पॅलेस काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी ६६ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
चोरटयांनी हे कमोड उखडून काढले आणि ते पळवले. कमोड उखडून काढताना त्या ठिकाणची पाईपलाईन तुटली आणि सगळीकडे पाणी भरलं. त्यामुळे ब्लेनहेम पॅलेसलाही मोठं नुकसान झाले आहे.
ऑक्सफर्डशायर शहरात असलेलं ब्लेनिम पॅलेस अठराव्या शतकातील ऐतिहासिक स्थळ आहे. गुरुवारपासून या पॅलेसमध्ये प्रदर्शन सुरू झालं होतं. तिथं हे सोन्याचं कमोड प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. या कमोडचा वापर केला जात होता आणि प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्यांना याचा वापर करण्यासही सांगितलं जात होतं.
हे टॉयलेट अमेरिका नावाने ओळखलं जात होतं. या टॉयलेटचे सर्वात आधी न्यूयॉर्कमध्ये २०१६ मध्ये प्रदर्शन झालं होते. पॅलेसमध्ये येणाऱ्या लोकांना हे टॉयलेट वापरता यायचं सोबतच जे लोक ब्लेनहेम पॅलेसमध्ये येत, त्यांना इथल्या सिंहासनावर सुद्धा बसता यायचं. मात्र, त्यासाठी मोठी रांग असायची, त्यामुळं सिंहासनावर बसण्याचा अवधी तीन मिनिटं केवळ ठेवण्यात आला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.