क्लर्कची नोकरी सोडून धर्मगुरु बनलेल्या कल्की भगवानकडे छाप्यात सापडले करोडो रुपये

भगवान विष्णूच्या कली अवताराची कथा : भगवान विष्णूच्या दशावताराच्या कथा आपल्याला माहित असतील. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल त्या त्या वेळेस भगवान विष्णू अवतार घेऊन अधर्माचा नाश आणि धर्माचे रक्षण करतात असा त्या दशावतार कथेचा सार आहे.

धार्मिक मान्यतेनुसार कलियुगात कली हा विष्णूचा दहावा अवतार असणार आहे. कलियुगात जेव्हा अधर्म, पाप वाढतील तेव्हा भगवान विष्णू कलीचा अवतार घेऊन प्रकट होतील आणि तेव्हा सर्व जग नष्ट होईल असे सांगितले जाते.

स्वतःला विष्णूचा अवतार सांगणार कल्कि भगवान

स्वतःला विष्णूचा दहावा अवतार सांगणारा एक धर्मगुरु उदयाला आला आहे. या धर्मगुरूचे मूळ नाव विजय कुमार नायडू असे असून तो स्वतःला कल्कि भगवान म्हणवून घेतो. आज त्याचे वय ७० वर्षे असून ३० वर्षांपूर्वी हा व्यक्ती लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये क्लार्कची नोकरी करत होता. नोकरी सोडल्यानंतर त्याने स्वतःला कल्की अवतार सांगायला सुरुवात केली. विजय कुमार नायडू उर्फ कल्की महाराज विदेशी नागरिकांना अध्यात्माचे धडे द्यायचा.

कल्की भगवानच्या आश्रमांवर छाप्यात सापडले ५०० कोटी

दक्षिण भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिनाडू राज्यात कल्की महाराज आणि त्याचा मुलगा एन.के.वी. कृष्णाचे अनेक आश्रम आहेत. आयकर विभागाने कल्की भगवानच्या कल्की आश्रम, चित्तूर आश्रम अशा ४० ठिकाणी छापे घातले. या छाप्यांमध्ये ५०० कोटींहून अधिक संपत्ती सापडली. त्यात १८ कोटी रुपयांचे अमेरिकन डॉलर, ८८ किलो सोने, ५ कोटींचे हिरे, ४४ कोटी रुपये रोकड रक्कम अशा गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. १६ ऑक्टोबरपासून ही छापेमारी सुरु होती.

कल्की महाराजचा अज्ञात स्थळाहून व्हिडीओ जारी

देशात तसेच देशाबाहेरही रियल इस्टेट, स्पोर्ट, कन्स्ट्रक्शनमध्ये कल्की महाराजचे साम्राज्य पसरले आहे. आयकर विभागाच्या छाप्याची कुणकुण लागताच कल्की महाराज पसार झाला असून पोलिसांनी तो परदेशात पळून गेला असण्याची शक्यता वर्तवली होती.

परंतु कल्की महाराज उर्फ विजय कुमार नायडूने आपल्या भक्तांसाठी आपण देश सोडून कुठेही गेलो नसल्याचा सांगणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मी इथेच असून माझी प्रकृती ठीक असल्याचे त्याने भक्तांना व्हिडिओमधून सांगितले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.