संजय दत्तचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याच्या कडेवर एक लहान मुलगी खेळताना दिसत आहे. हा फोटो संजय दत्तच्या १९९४ मधील “जमाने से क्या डरना” या चित्रपटाच्या शूटिंगवेळीच आहे. या फोटोतील मुलीला कदाचित तुम्ही ओळखू शकणार नाही, ही मुलगी बॉलिवूडमधील एक नवोदित अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे या मुलीचे शाहरुख खान आणि करीना कपूर सोबत एक खास कनेक्शनही आहे. पाहूया कोण आहे ही अभिनेत्री…
कोण आहे ती मुलगी ?
संजय दत्तच्या कडेवर बसलेली ती मुलगी आहे मालविका राज ! मालविका ही प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर बॉबी राज यांची मुलगी आणि अभिनेत्री अनिता राजची पुतणी आहे. मालविकाने “कभी ख़ुशी कभी गम” चित्रपटात बाळ कलाकार म्हणून शाहरुख खानची मेव्हणी आणि करीना कपूरच्या लहानपणीची भूमिका केली होती. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. मालविकाने मॉडेलिंगही केले. आता ती २९ वर्षांची झाली आहे. तिने तेलगू चित्रपट “जयदेव” मध्येही काम केले आहे.
आता करते बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम
कभी ख़ुशी कभी गम चित्रपटानंतर मालविका बॉलिवूडमधून अचानक गायब झाली होती, परंतु २०१७ मध्ये आलेल्या “कॅप्टन नवाब” चित्रपटात इमान हाश्मीसोबत ती दिसली होती. आता लवकरच आगामी “स्क्वॉड” चित्रपटात डॅनी डेन्झोंगपाचा मुलगा अभिनेता रिन्झिंग डेन्झोंगपा बरोबर दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही ऍक्शन, थ्रिलर आणि रोमान्स करताना दिसतील. मालविका त्यात अरिया ही भूमिका साकारत असून तीला शस्त्रांची उत्तम जण असल्याचे दाखवले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.