घर बांधून आपल्या घरातील लोकांसोबत त्यात आरामात आयुष्य व्यतीत करणं हे माणसाचं स्वप्न असतं. पण आपल्या घरात आगंतुकपणे येऊन कुणी राहिलं तर आपल्याला आवडत नाही. मग ते नातेवाईक असो वा मित्र ! पण मग घरात राहणाऱ्या पालींचे काय ? त्या सुद्धा आगंतुकच आहेत.
भिंतीवर फिरणाऱ्या पालींमुळे घरातील महिला, मुले घाबरतात. कधी कपड्यांवर, कधी अन्नावर त्यांचा उपद्रव होतो. अशा पालींमुळे जर आपण ट्रस्ट असाल तर घरातील पाली पळवून लावण्यासाठी हे उपाय करा.
१) ज्या ठिकाणी पाली सर्वाधिक वेळ लपून बसतात त्या ठिकाणी एखादा कांदा कापुन ठेवावा. कांद्याला येणाऱ्या उग्र वासामुळे पाली पळून जातात. २) आपल्या घराच्या कोपऱ्यात मिर्ची पावडर फवारल्यास पाली पळुन जातील. पाली पळवुन लावण्यासाठी हा खूप सोपा मार्ग आहे.
३) घरघुती मसाल्यात वापरली जाणारी काळी मिरी बारीक पावडर करुन पाण्यातून घराच्या भींतीवर फवारल्यास पाली घरामध्ये फिरकायचं नाव सुद्धा घेणार नाहीत.
४) लसणाचा उग्र वासही पालींना सहन होत नाही. पाली पळवुन लावण्यासाठी आपण लसूणही वापरू शकता. ५) कॉफीची भुकटी तंबाखूच्या भुकटीत मिसळून ज्या जागी पाली फिरत असतात तिथे ठेवल्यास तिकडे पाल परत येत नाही.
६) अंड्याचे टरफल घरामध्ये ठेवल्यावर पाली घरामध्ये फिरकत नाहीत. दर ३-४ दिवसांनी टरफले बदलून हा प्रयोग करावा. ७) बर्फाचे थंडगार पाणी पालींवर फवारल्यास पाली घाबरून परत घरात येत नाहीत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.