“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत यंदा १२ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. दहा दिवस आपल्या घरात किंवा गावातील मंडळात गणपती बसवून तुम्ही त्याची पूजा केली असेल.
दोन वेळ आरती केली असेल. सांस्कृतिक कार्यक्रम घेतले असतील. विविध उपक्रम राबवले असतील. दहा दिवस बघता बघता समोर आले. आता आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिभावे निरोप देण्यासाठी आपली तयारीही सुरु झाली असेल. पण आपण आपल्या लाडक्या गणपतीचे विसर्जन का करतो ? माहित आहे का ? चला तर जाणून घेऊया…
पुण्यातील क्रांतिकारक भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम भारतात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. दहा दिवस गणेशोत्सव आयोजित करून त्या माध्यमातून भारतीयांना एकत्र आणायचे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांना जागे करायचे असा रंगारींचा विचार होता.
त्यांची ही कल्पना बाळ गंगाधर टिळकांनाहा आवडली आणि त्यांनीही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. याचा परिणामही अगदी हवा तसाच झाला. लोक धार्मिक भावनेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकत्र आले. स्वातंत्र्य लढ्यासाठी ही मोठी प्रेरणा ठरली.
का केले जाते गणेश विसर्जन ?
धार्मिक ग्रंथांनुसार वेद व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग १० दिवस श्रीगणेशाला महाभारत कथा सांगितली होती. ती कथा श्रीगणेशाने अक्षरशः लिहून काढली. १० दिवसानंतर जेव्हा वेद व्यासांनी आपले डोळे उघडले, तेव्हा त्यांना आढळले की दहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे गणेशाचे तापमान खूप वाढले होते. ताबडतोब वेद व्यास गणेशाला जवळच्या तलावात घेऊन गेले आणि त्याला थंड केले. म्हणूनच गणेशाची स्थापना करून चतुर्दशीला गणपतीला पाण्याने थंड केले जाते.
पुढे याच कथेत असेही सांगितले आहे की, गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेद व्यासांनी गणपतीच्या शरीराला सुगंधित मातीचा लेप दिला होता. हा लेप सुकल्यानंतर गणपतीचे शरीर ताठ झाले. मातीही गळायला लागली. मग गणपतीला थंड तलावावर नेऊन पाण्यात उतरवण्यात आले.
या दहा दिवसांदरम्यान वेद व्यासांनी गणपतीला आवडते भोजन दिले. तेव्हापासून प्रतिकात्मकरीत्या गणेशाची मूर्ती स्थापन करून दहा दिवस गणपतीला मोदकांचा प्रसाद चढवून दहा दिवसानंतर पाण्यात नेऊन विसर्जन करण्याची प्रथा पडली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.