लडाखच्या ज्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली, त्या खोऱ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. गलवान व्हॅलीचे नाव एका गुलामाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. या गुलामानेच गलवान नदी आणि गलवान खोऱ्याचा शोध लावला होता. कुठल्या व्यक्तीच्या, त्यातल्या त्यात गुलामांच्या नावाने एखाद्या नदीचे नाव ठेवण्यात आल्याची ही दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना आहे. चला तर पाहूया गलवान व्हॅलीचा शोध लावणाऱ्या गुलामाची कथा…
कोण होता तो गुलाम ज्याने गलवान व्हॅलीचा आणि नदीचा शोध लावला ?
रसूल गलवान असे त्या गुलामांचे नाव असून तो लडाखचा रहिवासी होता. त्यानेच गलवान नदी आणि खोऱ्याचा शोध लावला. त्याच्या नावाच्या इंग्रजी GALWAN स्पेलिंगमुळे त्याचा उच्चार गलवान असा केला जाऊ लागला व पुढे तेच नाव रुढ झाले. काश्मिरी भाषेत गालवन या शब्दाचा अर्थ आहे घोड्यांची देखरेख ठेवणारा !
फॉरसेकिंग पॅराडाईज पुस्तकाच्या अनुसार १८९५ साली रसूल गालवन हा गुलाम जवळपास एक वर्ष आणि तीन महिने मध्य आशिया आणि तिबेटची कठीण यात्रा करुन लेहला आला होता. त्याच्या गावाचे नाव थिकसे असे होते. त्याचे पूर्वज काश्मीर वंशाचे होते. १८९९ साली लेह मधून त्याने ट्रेकिंगला सुरुवात केली आणि लडाखमधील अनेक भौगोलिक क्षेत्रांचा शोध लावला.
गुलाम रसूल गालवन याने आपल्या यात्रेची पूर्ण कहाणी आणि अनुभव एका पुस्तकाच्या रुपाने जतन करुन ठेवले, त्या पुस्तकाचे नाव होते “सर्व्हंट ऑफ साहिब्स” म्हणजेच साहेबांचे नोकर ! या पुस्तकाची चर्चा यामुळेही झाली होती की गुलाम शिकले सवरलेले नव्हते. रसूल अत्यंत कमी वयात धाडसी प्रवासी म्हणून ओळखले जाणाऱ्या सर फ्रान्सिस यंगहसबंडच्या कंपनीत सामील झाला.
फ्रान्सिसने तिबेटचे पठार, मध्य आशियातील पामीर पर्वत आणि वाळवंटाचा शोध लावला. तेव्हाच रसूलने चिनी, इंग्रजी आणि इतर भाषांवर आपली पकड बनवायला सुरु केली. याचदरम्यान मोडक्यातोडक्या इंग्रजी शब्दात रसूलने हे पुस्तक लिहले. या पुस्तकाचा सुरुवातीचा भाग फ्रान्सिसने लिहला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.