ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

एका पारंपरिक हिंदू कुटुंबात जोईता मोडंल यांचा जन्म झाला. जोईता या तृतीयपंथी असल्याने त्यांना लहानपणापासून खूप भेदभाव आणि त्रास सहन करावा लागला. त्यांना याच कारणामुळे पुढे शाळा सोडावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांना भीक मागावे लागले आणि बस स्टँडवरही झोपावे लागले. आता त्या स्वतःला खूप समाधानी मानतात, कारणही तसेच आहे. त्या बनल्या आहेत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश.

29 वर्षीय जोयंतो (पुरुष) यांचा जन्म कोलकाता शहरात झाला. शाळेत त्यांचे जेंडर बद्दल असलेल्या शाळेच्या पूर्तता त्या करण्यास अपयशी ठरल्याने त्यांना इयत्ता 10 वि मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले. एका चॅनेल दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जॉईता यांचा भिकारी तृतीयपंथी ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. एक तृतीयपंथी न्यायाधीश बनण्याचा क्षण तृतीयपंथीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा कौतुकाचा आहे. जॉईतांचा हा प्रवास मुकीच सोपा नव्हता. केवळ विचारांच्या परिवर्तनामुळे आणि मनात असलेल्या जिद्दीमुळेच जीवन जगण्यासाठी भीक मागणे, भीक मागता मागता सामाजिक काम करणे आणि त्याचसोबत आपले शिक्षण सुरू ठेवणे, हे सगळे जॉईताने केले आहे.

जॉईता या कोलकाता मध्ये होणाऱ्या भेदभावला कंटाळून उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आल्या आणि परत गेल्याच नाही.सुरुवातीच्या काळात त्यांनी हिजडा म्हणून काम करण्याबरोबर इतर तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी ही लढा दिला. त्यानंतर त्यांनी समाजातील प्रत्येक भेदभाव होणाऱ्या व्यक्तीसाठी लढा उभारला. त्यांनी या सर्व कामांसोबत आपले मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले.2010 साली त्यांना आपले मतदान कार्ड मिळाले. आपल्या जिल्ह्यात मतदान कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी होत्या.

काही वर्षांपूर्वी जॉईता यांनी समाजातील वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी स्वतःची एक संस्थाही चालू केली. जिल्यातील हजारो व्यक्तींना त्यांची संस्था मदत पोहोचवते. आतापर्यंत मिळालेल्या यशा व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या तृतीयपंथीपणामुळे हॉटेल मध्ये रूम न मिळाल्यामुळे बस स्टँड वर झोपावं लागल्याच्या वाईट स्मृतींना TOI ला दिलेल्या मुलाखतीत उजाळा दिला.

कोलकाता येथील घर सोडल्यानंतर 10 वर्षांनी आता जुलै मध्ये जॉईता यांची दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी त्या झोपत असलेल्या बस स्टँड पासून त्यांची निवड झालेले न्यायालय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. असे त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलखातीत म्हटले आहे. 8 जुलै या दिवशी जॉईता यांना इस्लामपूर सब-डिव्हिजनल लीगल सर्व्हिस कमिटीने न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतर तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला येऊ न देण्यासाठी जॉईता नेहमी प्रयत्नशील असतात.

जॉईतांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘माझ्या यशाबद्दल मला अभिमान आहे. न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. तृतीयपंथी समाजातील 2-3 टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळावून देता आल्या तर मला माझ्या पदाबद्दल समाधान वाटेल. कारण इतर जे तृतीयपंथी 100-200 रुपयांसाठी सेक्स वर्कर्सचं काम करतात, त्यांनाही या त्रासापासून मुक्तता मिळेल व ते सुखाची झोप घेऊ शकतील.’ त्या पुढे बोलताना म्हणाल्या की ‘मी जरी आता वातावणूकुलीत गाड्यामध्ये फिरत असले तरी माझ्या समाजातील इतर तृतीयपंथीना दिवसा भीक आणि सेक्स वर्कर्स म्हणूनच काम करावे लागत आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.