क्रिकेटच्या इतिहासातील पहिली नाणेफेक, धाव, शतक कोणी, कधी आणि कुठे केले ?

इंग्लंड हा क्रिकेटचा जनक मानला जातो. सुरुवातीला हा श्रीमंत लोकांचा खेळ असायचा, परंतु नंतर त्यात सामान्य लोकांच्या वाढत्या सहभागामुळे तो जगभर प्रसिद्ध झाला. या लेखाच्या माध्यमातून आम्ही जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा घडलेल्या गोष्टी इथे सांगणार आहोत…

१) क्रिकेटच्या इतिहासातील पहिला सामना :

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न येथे १५ ते १९ मार्च १८७७ दरम्यान खेळला गेला. तर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्न येथे खेळला गेला होता. तसेच टी -२० क्रिकेटच्या इतिहासातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात १७ फेब्रुवारी २००५ रोजी खेळला होता.

२) क्रिकेटच्या इतिहासातील पहिली नाणेफेक आणि पहिला विजय :

एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतले होते. पहिल्या सामन्यात इंग्लंडने केवळ १९० धावा केल्या होत्या तर ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्स गमावून १९१ धावा करून पहिला एकदिवसीय सामना जिंकला होता. हा सामना ४० षटकांचा होता. कसोटी क्रिकेटचा पहिला नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करताना त्यांनी पहिल्या डावात २४५ आणि दुसऱ्या डावात १०४ धावा केल्या.

इंग्लंडने दुसऱ्या डावात १५४ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण ते केवळ १०८ धावांवर बाद झाले आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाने जगातील पहिला कसोटी सामना जिंकला. टी-२० मधील पहिला विजयही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे आला. पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ४४ धावांनी पराभूत केले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया हा जगातील एकमेव संघ आहे ज्याने पहिला कसोटी, पहिला वनडे आणि पहिला टी-२० सामना जिंकला आहे.

३) पहिले शतक :

कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमनला मिळाला आहे. पहिल्या कसोटीत बॅनरमनने १६५ धावांची खेळी करुन हे स्थान मिळवले होते. डेनिस एमिसने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावण्याचा पराक्रम केला. एमीसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९७२ मध्ये पहिले वनडे शतक झळकावत १०३ धावा केल्या होत्या. टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केले होते.

४) पहिला चेंडू, पहिली धाव, पहिली विकेट, पहिला चौकार :

१८७७ मध्ये अल्फ्रेड शॉ याने चार्ल्स बॅनरमॅनला कसोटी सामन्याचा पहिला चेंडू टाकला होता. इंग्लंडच्या एलन हिल याने पहिली कसोटी विकेट आणि पहिला झेल घेतला होता. इंग्लंडच्या ब्लॅकहॅमने पहिले स्टंपिंग केले होते. ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमनने कसोटी क्रिकेटचा पहिला चौकार मारला होता. डब्ल्यूई मिडविन्टरने पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये पाच विकेट घेतल्या होत्या. एकदिवसीय सामन्यात पहिला विकेट घेणारा गोलंदाज एलन थॉमसन होता. थॉमसनने जेफ्री बायकॉटला बाद करुन एकदिवसीय इतिहासातील पहिली विकेट घेतली होती.

५) पहिले द्विशतक, त्रिशतक आणि चौशतक :

इंग्लंडविरुद्ध १८८४ मध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज बिली मरडॉकने २११ धावा काढून कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. १९३० मध्ये इंग्लंडच्या अ‍ॅंडी सँडमने वेस्ट इंडिजविरुद्ध ३२५ धावा काढून कसोटी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने 2004 मध्ये इंग्लंडविरूद्ध हा पराक्रम केला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा पहिला फलंदाज सचिन तेंडुलकर होता .

६) प्रथम हॅटट्रिक :

कसोटी क्रिकेटमध्ये १८७८ मध्ये फ्रेड्रिक स्पॉर्थ याने इंग्लंडविरुद्ध पहिली हॅटट्रिक घेतली होती. एकदिवसीय क्रिकेटची पहिली हॅटट्रिक पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जलालुद्दीनने १९८२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध घेतली होती . टी-20 सामन्यात पहिली हॅटट्रिक २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने बांगलादेशविरूद्ध घेतली होती.

७) पहिल्या डावात ५ विकेट आणि १० गडी :

क्रिकेटमधील डावात ५ विकेट घेणारा पहिला गोलंदाज बिली मिडविन्टर हा होता . डावात सर्व १० बळी मिळविण्याचे पहिला पराक्रम इंग्लंडच्या जिम लेकरने १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.