शबनम, जी स्वतंत्र भारतात फाशी दिली जाणारी पहिली महिला ठरू शकते!

15 एप्रिल 2008. उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गाव ! रात्रीचे सुमारे अडीच वाजले असतील. कोपऱ्यावरील घरातून त्यांनी एक मुलगी मोठमोठ्याने ओरडत होती. तिचा आवाज ऐकून शेजारचे लोक जमले. त्यांनी घरात प्रवेश केल्यावर समोरचे चित्र बघितले तेव्हा सगळे स्तब्ध झाले. आत सात जणांचे मृतदेह पडले होते. त्या मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्य मारले गेले होते. कोणी जिवंत राहिले असेल तर ती २५ वर्षाची मुलगी, जीचे नाव शबनम होते. जे लोक मारले गेले होते त्यात शबनमचे आईवडील, तीचे दोन भाऊ, तीची वहिनी, तिच्या मावशीची मुलगी आणि आणि तिचा एक भाचा !

या घटनेमुळे त्या गावात एकच गोंधळ माजतो. मिडीयापासुन ते पोलिस, नेतेमंडळी सगळे जमा होतात. जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू होतात. बऱ्याच लोकांना नेमकं काय घडलंय हे निश्चितपणे माहित नव्हते. फक्त काहीतरी वाईट घडले आहे एवढं त्यांना कळत होते. तिकडे शबनम हमसून रडत रात्रीची घटना लोकांना सांगत होती की, कसा लुटारुंनी आपल्या घरात प्रवेश केला आणि कसे तीच्या सगळ्या कुटुंबाला ठार केले.

ती बाथरुममध्ये असल्यामुळे तिचा जीव वाचला. त्यानंतर पोलिस त्या लुटारुंचा शोध घ्यायला सुरुवात करतात, मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करुन घेतात. त्या दिवशीचे सगळे कॉल रेकॉर्डिंग बघितले जातात. लुटारु काय सापडत नाहीत, पण बाकीच्या तपासातुन या खुनामागचे घृणास्पद सत्य समोर येतं !

प्रत्यक्षात पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शबनमच्या कुटुंबाला ठार करणारे कोणी लुटारु नव्हते, कारण तसं काही असतं तर त्या मृतांपैकी कोणीतरी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केलेला दिसला असता. प्रत्यक्षात तसं काही दिसत नव्हते. तसेच शबनम खुनामागचे जे लुटालूट वगैरे कारण सांगत होती, तसे तिच्या संपूर्ण घरात काहीच सापडले नाही. शेवटी पोस्टमॉर्टम अहवालात समजले की मृत लोकांना ठार मारण्याआधी गुंगीचे औषध देण्यात आले होते. याचा अर्थ खुन करणारा घरातीलच कोणीतरी सदस्य होता.

त्याने पूर्ण विचारपूर्वक थंड डोक्याने हा खुन केला होता. पोलिसांच्या संशयाची सुई शबनमवर जाऊन थांबली. शबनमचे कॉल रेकॉर्ड तपासल्यावर शबनम एका नंबरवर खूप वेळा बोलल्याचे दिसले. अजुन एक गोष्ट दोनच दिवसांनी पोलिसांना समजली, ती म्हणजे शबनम गर्भवती असल्याची ! पण तीचे अद्याप लग्नसुद्धा झाले नव्हते. हे सगळे पुरावे परिस्थीतीजन्य आणि कमकुवत होते. पण वास्तव पुरावा ? जसा की खुन करण्यासाठी वापरलेली शस्त्रे ! ती कुठून आली, ते कुठे गेली ? एकही साक्षीदार नाही. पोलिसांनी कठोर चौकशी केली. तेव्हा शबनमने सगळी घटना सांगितली. अशी घटना ज्यामुळे आज अकरा वर्ष उलटली तरी बावनखडी आणि आसपासच्या गावातील कोणीही आपल्या मुलीचे नाव शबनम ठेवत नाही.

ही अविश्वसनीय गोष्ट सुरु होते शबनम आणि सलीम यांच्यातील प्रेमापासुन ! पण शबनामच्या कुटुंबातील लोकांना हे मान्य नव्हते. शबनमलाही आपल्या कुटुंबातील लोकांचा नकार आवडला नाही. मग एक चांगला दिवस गाठुन शबनमने सलीमसोबत कट रचून स्वतःच्या कुटुंबातील सात लोकांचा खुन केला. सुरुवातीला त्यांनी प्रत्येकाच्या अन्नामध्ये काहीतरी मिसळले आणि त्यानंतर एका धारदार कुऱ्हाडीने एकापाठोपाठ एक असे सगळ्या कुटुंबाला ठार केले. त्या रात्री फोनवर शबनमशी बोलणारा माणूस प्रत्यक्षात सलीम होता. सलीमने आपला गुन्हा स्वीकारला आणि खुनासाठी वापरलेली ती कुऱ्हाड त्याने सांगितलेल्या घाणेरड्या तलावाच्या किनाऱ्यावरुन पोलिसांनी हस्तगत केली.

आज शबनम जेलमध्ये आपल्या फाशीची वाट बघत दिवस काढत आहे. सुप्रीम कोर्टाने तिची फाशीची शिक्षा कायम ठेवली. शबनमने राष्ट्रपतींना देखील साद घातली पण घटनेची क्रूरता पाहता राष्ट्रपतींनीही तिला माफी दिली नाही. सलीमच्या बाबतीतही हीच शिक्षा कायम ठेवली आहे. येत्या काही दिवसातच सुप्रीम कोर्ट शबनमच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करणार आहे. त्यात तिची शिक्षा कायम ठेवली तर स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा दिली जाईल अशी शबनम ही पहिली महिला असेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.