सयाजीराव गायकवाडांच्या साक्षीने या मराठी माणसाने सर्वात पहिले विमान उडवले होते

हवेत उडण्याचे स्वप्न माणसाने पूर्वीपासूनच बघितले आहे. म्हणूनच खांद्याला सुपाप्रमाणे पंख बांधुनते हाताने फडफडवत हवेत उडण्याचे प्रयोगही माणसांनी केले. परंतु आपले वजन पेलून हवेत उडण्याचे कसब त्यांना अवगत झाले नाही. पॅराशूटच्या साहाय्याने देखील हवेत उडण्याचे प्रयोग झाले. पण कुठलीही जड वस्तू हवेत तरंगत ठेवायची असेल तर ती वस्तू हवेत गतिमान असावी लागते हे हवेत विमान उडवण्यामागचे विज्ञान तेव्हा अनेकांना समजलेच नाही.

श्रीलंकेच्या सरकारने देखील नुकतेच ५००० वर्षांपूर्वी रावणाने सर्वात पहिल्यांदा विमान उडवले होते असा दावा केला आहे. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन त्यांनी लोकांकडून त्यासंबंधी काही माहिती असल्यास ती मागविली आहे. म्हणजेच त्यांनी आधी निष्कर्ष काढून नंतर पुरावे शोधायला सुरुवात केली आहे, यावरुन त्यांच्या दाव्यात किती तथ्य असेल हे समजते. पण आम्ही तुम्हाला अशा एका मराठी माणसाविषयी सांगणार आहोत, ज्याने सर्वात पहिल्यांदा विमान उडवण्याचा यशस्वी प्रयोग केला होता.

कोण आहे तो मराठी माणूस ज्याने सर्वात प्रथम विमानाचा यशस्वी प्रयोग केला ?

१७ डिसेंबर १९०३ रोजी विल्बर राईट आणि ऑर्विल राईट या बंधूनी विमानाचा शोध लावल्याचे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत. पण त्यांच्या आधी ८ वर्ष एका मराठी माणसाने विमान उडवण्याचा यशस्वी प्रयोग केला होता हे अनेकांना माहित नाही. त्या मराठी व्यक्तीचे नाव शिवकर बापूजी तळपदे असे आहे. तळपदे हे मुंबईतील संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांचे गुरु सुब्राय शास्त्री यांच्या वैमानिकशास्त्र या ग्रंथावरुन त्यांना विमान उडवण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे मानले जाते.

कधी केला शिवकर तळपदेंनी विमान उडवण्याचा यशस्वी प्रयोग ?

तळपदेंनी आपल्या विमानाला “मरुत्सखा” असे नाव दिले होते, त्याचा अर्थ आहे हवेचा मित्र ! १८९५ साली आपल्या विमानाचा प्रयोग करण्यासाठी तळपदेंनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीची निवड केली. आपला प्रयोग पाहण्यासाठी त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड आणि महादेव गोविंद रानडे यांनाही बोलावले. आपले “मरुत्सखा” हे मानवरहित विमान काही मिनिटांपर्यंत हवेत उडवून तळपदेंनी सर्वात पहिल्यांदा विमानाचा यशस्वी प्रयोग केला. केसरी वर्तमानपत्रातही त्याच्या बातम्या छापून आल्या.

पुढील संशोधनासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने तळपदेंनी आपल्या प्रयोगास स्थगिती दिली. शिवकर तळपदेंनी “प्राचीन विमानकलेचा शोध” नावाचे एक पुस्तकही लिहले. २०१५ साली आलेला हवाईजादा हा चित्रपट शिवकर तळपदेंच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जाते, त्या चित्रपटात तळपदेंचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करुन त्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.