तसे पाहायला गेले तर बरेली आणि झुमक्याचे कसलेही कनेक्शन नाही. १९६६ साली रिलीज झालेल्या “मेरा साया” चित्रपटात अभिनेत्री साधना “झुमका गिरा रे बरेली की बाजार में” या गाण्यावर नाचताना आपण सर्वांनी पाहिले असेल. हे गाणे आल्यापासुन बरेली सोबत झुमक्याचे नाव जोडले गेले आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात इथल्या झुमक्याविषयी आकर्षण असते. पण इथे येणाऱ्या कुणालाही त्या गाण्यातील झुमका सापडला नाही. मात्रा आता बरेलीला बाजारात हरवलेला तो झुमका मिळाला आहे. पाहूया कसा आहे हा झुमका…
कसा मिळाला बरेलीच्या बाजारातील झुमका
“झुमका गीर रे” गाण्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बरेलीत झुमक्याची प्रतिकृती तयार करण्याची कल्पना बरेली विकास प्राधिकरणाला सुचली. तसेच अभिनेत्री साधनालाही ही श्रद्धांजली ठरेल असा त्यांचा विचार होता. परंतु त्यासाठी लागणार खर्च मोठा असल्याने प्राधिकरणाने बरेलीतील लोकांना आवाहन केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे मालक डॉ.केशव अग्रवाल यांनी झुमका लावण्याची जबाबदारी उचलली. त्यानंतर बार्लीची ओळख असणारा झुमका तयार करण्यास सुरुवात झाली होती.
असा आहे हा झुमका
उत्तर प्रदेशातील बरेलीत उभारण्यात आलेल्या या झुमक्याचे वजन तब्बल २०० किलो असुन तो २० फूट उंचावर लावण्यात आला आहे. या झुमक्याला लावलेल्या रंगीत दगडांवर जरीचे कोरवकाम केलं आहे. ९ फेब्रुवारी २०२० रोजी बरेलीच्या मुखद्वाराजवळ राष्ट्रीय महामार्ग २४ वर असणाऱ्या “झेरॉ पॉईंट” या ठिकाणी या विशाल झुमक्याच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते या झुमक्याचे अनावरण करण्यात आले.
यापूर्वीही एकदा बरेलीत झुमका लावण्याचा प्रयत्न झाला होता. सुरुवातील बरेलीतील डेलापार क्षेत्रात झुमका लावण्याची योजना होती, नंतर ते ठिकाण बदलून कंपनी बाग हे ठिकाण निवडण्यात आले होते. पण दोन्ही ठिकाणी झुमका लागला नाही. त्यानंतर लोकांकडून झुमक्याचे डिझाईनही मागवण्यात आले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.