अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘मिशन मंगल’ चित्रपट भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित असून मंगळयान मोहिमेत महिलांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून चित्रपट पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करत आहे. अक्षय कुमार, तापसी पन्नू आणि विद्या बालन यांच्यासह चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुलहड़ी, नित्या मेनन यांच्या भूमिका आहेत. या सर्व अभिनेत्रींनी मंगळ मोहिमेतील प्रमुख भूमिका असलेल्या पाच महिला शाश्त्रज्ञांच्या भूमिका निभावल्या आहेत.
खासरेवर जाणून घेऊया या चित्रपटात दाखवलेल्या या पाच महिला शाश्त्रज्ञ खऱ्या आयुष्यात कोण आहेत-
या चित्रपटात भारताच्या मंगळ मोहिमेची विजयगाथा दाखवण्यात आली आहे. २४, सप्टेंबर, २०१४ साली इस्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळावर यशस्वीपणे यान पाठवून पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये मोहिम फत्ते करणारी जगातील पहिली संस्था होण्याचा मान मिळवला.
१. मीनल संपत-
कोलकात्यामध्ये जन्मलेल्या मीनल संपत यांनी ‘निरमा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ मधून इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन मध्ये इंजीनियरिंग केली आहे. गोल्ड मेडलिस्ट असलेल्या मीनल नंतर इस्रो मध्ये पोहचल्या. त्यांनी इस्रोमध्ये सुरुवातीला सॅटेलाईट कम्युनिकेशन इंजिनिअर म्हणून नोकरी केली. त्या इस्रोमध्ये सध्या शास्त्रज्ञ आणि सिस्टम इंजिनिअर आहेत.
मंगळ मिशनमध्ये त्यांनी २ वर्ष प्रोजेक्ट मॅनेजर आणि सिस्टीम इंजिनिअर म्हणून काम पाहिले आहे. त्यांना दिवसातून १८-१८ तास खिडक्या नसणाऱ्या घरात घालवले आहेत. तसेच त्यांनी मंगळ मोहिमेदरम्यान त्यांनी २ वर्षात एक पण सुट्टी घेतली नव्हती.
२. अनुराधा टी. के.-
बंगळुरूमध्ये मध्ये १९६१ मध्ये जन्मलेल्या अनुराधा इस्रोमध्ये प्रोग्रॅम डायरेक्टर आहेत. १९६९ मध्ये जेव्हा निल आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला होता त्यावेळी त्या खूप छोट्या होत्या. त्या यावरून खूप प्रेरित झाल्या होत्या. कर्नाटकच्या विश्वेश्वरैया युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग केली. १९८२ मध्ये त्या इस्रोत आल्या.
३. रितू करिधल-
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये जन्मलेल्या रितू यांना लहानपणीपासून अंतराळ विज्ञानात खूप रुची होती. लखनौ युनिव्हर्सिटीमधून त्यांनी फिजिक्समध्ये BSC केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची प्रवेश परीक्षा पास झाल्या आणि एयरोस्पेस इंजीनियरिंग पूर्ण केली. रितू यांनी १९९७ मध्ये इस्रो जॉईन केलं. मंगळ मिशन यशस्वी झाल्यानंतर चांद्रयान-२ मध्ये पण त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्यांना रॉकेट वूमन म्हणून देखील ओळखले जाते.
४. नंदिनी हरिनाथ-
नंदिनी या इस्रोमध्ये रॉकेट शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या आई शिक्षक तर वडील इंजिनिअर होते. सर्वाना विज्ञानात खूप आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इस्रोमध्ये नोकरी जॉईन केली. आज त्यांना इस्रो मध्ये २० वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत इस्रोमध्ये १४ मिशन्स वर काम केले आहे.
५. मौमिता दत्ता-
मौमिता अहमदाबादच्या स्पेस एप्लीकेशन सेंटर (SAC) मध्ये शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांचा जन्म कोलकात्यात झाला. विद्यार्थी असतानाच चांद्रयान मिशनबद्दल ऐकलं होतं. तेव्हापासूनच त्यांना स्पेसमध्ये आवड निर्माण झाली होती. यूनिवर्सिटी ऑफ कोलकाता मधून एम टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या स्पेस एप्लीकेशन्स सेंटर मध्ये नोकरी जॉईन केली. त्यांनी मंगळ मोहिमेत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहिलं आहे.
इस्रोमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या पाच महिला शाश्त्रज्ञांना खासरेचा सलाम. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.