महाराष्ट्रात सध्या दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दूध भुकटीवरील निर्यातबंदी उठवावी, देशात दूध भुकटी शिल्लक असताना तिची आयात रद्द करावी, भुकटीचा बफर स्टॉक करावा आणि दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागण्यांसाठी दूधउत्पादकांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. दुधाचे दर कमी झाले की शेतकरी अडचणीत येतो आणि दर वाढले की ग्राहक अडचणीत येतो. या दोन्हींची सांगड घालायची म्हटले की शासन अडचणीत येते. सगळ्यांनाच अडचणी आहेत.
टीव्हीवर “अमूल दूध पिता है इंडिया” अशी एक जाहिरात आपण पाहिली असेल. अमूल ही गुजरातमधील डेअरी आहे. भारतातील सगळेच लोक काय अमूलचेच दूध पितात अशातला भाग नाही. पण यानिमित्ताने एक विषय सहज सुचला, तो म्हणजे अंबानीसारख्या मोठ्या उद्योगपतींच्या घरच्या लेकरांनाही दूध लागत असेल. मग ते दूध कुठून घेत असतील ? काय दराने घेत असतील ? चला तर मग आज आपण जाणून घेऊया…
अंबानींच्या घरी “या” डेअरीचे दूध जाते
आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये भाग्यलक्ष्मी नावाची एक डेअरी आहे. देवेंद्र शहा असे या डेअरीच्या मालकाचे नाव आहे. १७५ ग्राहकांपासून सुरु झालेल्या या डेअरीचे आज २२००० ग्राहक आहेत. त्यांचे १ लिटर दूध १५२ रुपयांना विकले जाते. मुंबईतील मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, कलाकार या डेअरीचे ग्रहजक आहेत. त्यामध्ये मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार इत्यादींचा समावेश आहे. हे काही आपल्या सध्या गायींसारखे दूध नसते, तर विशेष काळजी घेऊन हे दूध घेतले जाते.
भाग्यलक्ष्मी डेअरी फार्ममध्ये २००० हुन अधिक डच होल्स्टन गायी आहेत. दररोज २५००० लिटर दूध मिळते. या गायीची विशेष देखभाल ठेवली जाते. या गायींना पिण्यासाठी प्युरिफायड पाणी दिले जाते. दिवसातून तीन वेळा गायींना अंघोळ घातली जाते. गायींना बसायला रबर मॅट आहेत. गायींना दिवसरात्र संगीत ऐकवले जाते. गायीच्या चाऱ्यामध्ये सोयाबीन, अल्फा घास, ऋतुमानानुसार येणाऱ्या भाज्या आणि मका असते.
पायांवर जंतुनाशक पावडर मारल्याशिवाय फार्ममध्ये प्रवेश करता येत नाही. दूध काढण्यापूर्वी प्रत्येक गायीचे वजन व तापमान तपासले जाते. या गायीचे दूध काढण्यापासून ते दुधाचे पॅकिंग कारण्यापर्यंतची सगळी कामे ऑटोमेटेड मशिनरीच्या साहाय्याने केली जातात. पॅकेज झालेले दूध पुण्यावरुन १६३ किमी मुंबईला तीन तासात डिलिव्हरी व्हॅनने पाठवले जाते. पहाटे ५:३० वाजल्यापासून ही व्हॅन घरोघरी जाऊन दूध वितरित करते. भाग्यलक्ष्मी डेअरीचे मार्केट ९ लाख कोटींच्या घरात आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.