मेथी समजून संपूर्ण कुटुंबाने चूकून खाल्ली गांजाच्या पानांची भाजी

उत्तर प्रदेश मध्ये हि अशी घटना घडली आहे जी सांगते कि जगात किती नमुन्याचे लोक आहेत. एका मित्राने केलेली मजाक एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. या कुटुंबाने नेहमीप्रमाणे आपले साध्या मेथीच्या भाजीसोबत जेवण केले. पण हे जेवण त्यांना थेट दवाखान्यात घेऊन गेले.

उत्तर प्रदेशमधील कनूज येथे हा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी खाल्ली. कनूज येथील मियागानी गावामध्ये हा प्रकार घडला आहे.

नेमके काय घडले?

मियागानी येथील एका भाजी विक्रेत्याने मेथीच्या नावाखाली या कुटुंबातील निलेश नावाच्या व्यक्तीला चक्क गांजा वनस्पतीची जुडी विकली. विकणारा आणि निलेश हे मित्र होते. विक्रेत्याने गम्मत म्हणून हा प्रकार केला. पण आपण मेथीऐवजी दुसरेच काहीतरी घेऊन चाललोय याची निलेशला कल्पनाही नव्हती. घरी आल्यावर निलेशने त्याच्या वहिनीला ही भाजी दिली.

दुपारी चारच्या सुमारास निलेशच्या वाहिनी पिंकी यांनी ती भाजी बनवली त्यानंतर कुटुंबातील सहा जणांनी दुपारी पाचच्या सुमारास ही भाजी खाल्ल्याचे वृत्त अमर उजलाने प्रकाशित केले आहे. भाजी खाल्ल्यानंतर काही वेळात या कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ लागला. एक एक करत सर्वांचीच तब्बेत बिघडली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांना फोन करेपर्यंत कुटुंबातील सर्व सस्यांची शुद्ध हरपली आणि ते बेशुद्ध पडले.

शेजार्यांना सुरुवातील संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलीस जेव्हा आले तेव्हा त्यांना स्वयंपाकघरात कढईमध्ये शिजवलेली गांजांची भाजी दिसली. तसेच उरलेली गांजाची पानही त्यांना दिसली. पोलिसांनी ही शिजवलेली गांजाची भाजी आणि न शिजवलेली पान दोन्ही ताब्यात घेतलं आहे. या सहाही जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान पोलिसांनी भाजीविक्रेता नवल किशोर याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मित्र निलेशला मस्करी म्हणून मेथीऐवजी गांजाची पानं दिल्याचं सांगितले. या प्रकरणात संबंधित कुटुंबाने गुन्हा तक्रार केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.