२०१९ मधील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी आपल्याला आठवत असतील. सुधीर सूर्यवंशी यांनी महाराष्ट्राच्या २०२० च्या विधानसभा निवडणुकीतील घडामोडींवर लिहलेले “Checkmet : How BJP Won And Lost Maharashtra” नावाचे ईबुक अमेझॉनवर नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्या ईबुकमध्ये सूर्यवंशी यांनी “त्या” पहाटे अंधारात फडणवीसांनी शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी उत्तरेतून तांत्रिक आणून त्याच्या हस्ते केलेल्या बगळामुखी मिरची यज्ञाचा उल्लेख केला आहे. हा मिरची यज्ञ नेमका काय असतो आणि फडणवीसांनी तो का केला, हा प्रश्न आपल्याला पडला असेल. जाणून घेऊया त्याबद्दल…
असा केला फडणवीसांनी मिरची यज्ञ
२३ नोव्हेंबर २०१९ पहाटेच्या अंधारात फडणवीसांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु त्याआधी त्यांनी वर्षा बंगल्यावर मिरची यज्ञ केला होता. उत्तराखंड निवडणुकीनंतर हरीश रावतांनी असाच यज्ञ केल्याने त्यांचे सरकार पडता पडता वाचले होते असे फडणवीसांनी कुणाकडून तरी ऐकले होते. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या अपेक्षेने त्यांनी मध्यप्रदेशातील नालखेडा येथे लखुंदर नदीकाठी असणाऱ्या बगळामुखी मंदिराच्या तांत्रिकाला महाराष्ट्रात आणले आणि मुख्यमंत्री निवासस्थान असणाऱ्या वर्ष बंगल्यात गुप्तरित्या हा बगळामुखी मिरची यज्ञ केला. यज्ञ करताना फडणवीसांनी काळे जाकीट घातले होते. यज्ञ झाल्यावर तांत्रिकाला त्याचे मानधन देऊन घालवलं. प्रसाद लाड यांनी तांत्रिकाच्या येण्याजाण्याची सोय केली होती.
पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलेला मिरची यज्ञ नक्की आहे तरी काय ?
मध्यप्रदेशातील नालखेडा येथे लखुंदार नदीकाठी बगळामुखी मातेचे मंदिर आहे. तंत्र उपासकांसाठी हे महत्वाचे धार्मिक केंद्र आहे. या देवीला सत्तेची देवी म्हणून मान्यता आहे. राजकारणात यश मिळवण्यासाठी आणि शत्रूला रोखण्यासाठी हा यज्ञ केला जातो. लाल मिरची शत्रूचा नाश करते असा समाज असल्याने या यज्ञात लाल मिरच्यांची धुरी दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही औरंगजेबाच्या सांगण्यावरुन मिर्झाराजे जयसिंगाने असा बगळामुखी यज्ञ केला होता. परंतु मिर्झाराजे जयसिंगाप्रमाणे फडणवीसांचा यज्ञ देखील उलटला.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.