‘स्वप्न ते नाही जे झोपल्यावर येतात, स्वप्न ते आहे ज्यानी झोपच लागत नाही’, हे शब्द आहेत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम या गावी झाला. त्यांचे वडील हे एक न्हाविक होते. सुरुवातीपासून त्यांच्या घरची परिस्थिती गरीब होती. त्यामुळे लहानपणा पासूनच ते गावात वर्तमानपत्र विकून व अन्य छोटी मोठी कामे करून पैसे कमावत. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमूळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. तसेच त्यांना 40 विद्यापीठातुन डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ज्या वेळेस डॉ कलाम हे स्वित्झर्लंड दौऱ्यावर गेले होते तो दिवस 26 मे स्वित्झर्लंड मध्ये विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना नेहमी काही नवीन शिकण्याची आवड होती. शालेय शिक्षणात त्यांना गणिताची विशेष आवड लागली. त्यांनी आपले शालेय शिक्षण फार साधारण शाळेत पूर्ण केले. नंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथे सेन्ट जोसेफ कॉलेज मधून आपले बीएससी चे शिक्षण पूर्ण केले. एकदा तर त्यांची चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी मध्ये ऍरोनॉटिक डिप्लोमा साठी निवड झाली होती, पण त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास पैसे नव्हते त्यावेळेस त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहान ठेवून त्यांना प्रवेशासाठी पैसे दिले. अशा प्रकारे त्यानी आपला डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर त्यांना DRDO मध्ये वैज्ञानिक म्हणून निवडले गेले. त्यांनी तेथे भारतीय वायुसेनेसाठी हेलिकॉप्टर डिझाईन बनवण्याचे काम केले. 1963 मध्ये त्यांनी इस्रो मध्ये क्षेपणास्त्र विकासातील SLV च्या संशोधनात भाग घेतला. नंतर पुढे चालून ते इस्रोच्या सॅटेलाईट लौंचिंग व्हेहिकल-3 या प्रकल्पाचे ते प्रमुख बनले. भारतात स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार व्हावेत अशी त्यांची इच्छा तेव्हापासूनच निर्माण झाली. भारतासाठी त्यांनी एकाहून एक असे मिसाईल तयार केली आणि जगाला दाखवून दिले की भारतीय कशात कमी नाहीत. क्षेपणास्त्र विकास कार्यातील अग्नी या क्षेपणास्त्र च्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले. अशाच अनेक कामातील योगदानामुळे 2002 साली त्यांना भारताच्या राष्ट्रपती पदावर नियुक्त करण्यात आले. 27 जुलै 2015 रोजी शिलॉंग ईथे त्यांचे निधन झाले. तेव्हा सुद्धा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करत होते. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखविणारे राष्ट्रपती म्हणून राहतील.
जाणून घेऊया त्यांच्याबद्दल सामान्यपणे माहिती नसलेल्या काही गोष्टी…
1.अब्दुल कलाम यांचे घर-
डॉ अब्दुल कलाम यांचे राहणीमान अत्यंत साधारण होते, पण ते खूप मोठ्या ह्रदयाचे होते. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी ते एका खोलीच्या फ्लॅटमध्ये राहत होते.
2. भारतरत्न स्वीकारताना डॉ अब्दुल कलाम-
भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले.
3. भारताचे मिसाईल मॅन-
त्यांच्या क्षेपणास्त्र विकासातील कामामुळे ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात. त्यानी भारतासाठी अनेक क्षेपणास्त्र बनवली.
4. शाळा सुटल्यावर वाटायचे वर्तमानपत्र-
डॉ कलाम हे खूप मेहनती व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी खूप गरीब परिस्थितीत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि वडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ते शाळा सुटल्यावर वर्तमानपत्र विकत असत. तर अनेक छोटेमोठे कामही करत असत.
5. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीत आणि एम एस सुबलक्ष्मी यांच्याबद्दल खुप आदर होता. कर्नाटक संगीत त्यांना फार आवडायचं. सुबलक्ष्मी स्वतः आपल्या हातांनी जेवण बनवून डॉ. कलाम यांना वाढायच्या. त्यावेळी जेवतांना ते अगदी पारंपरिक पध्दतीने म्हणजे खाली जमिनीवर बसून केळाच्या पानात जेवायचे.
6. ट्विटर वर डॉ. कलाम यांचे आहेत लाखो फॉलोअर्स-
त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वामुळे ट्विटरवर त्यांचे लाखो चाहते होते.
7. ट्विटरवर डॉ. कलाम यांनी फॉलो केलेला व्ही व्ही एस लक्ष्मण हा एकमेव क्रिकेटपटू आहे.
8. डॉ. अब्दुल कलाम यांची शाळा.
डॉ. कलाम हंस अत्यंत गरीब कुटुंबातुन होते. त्यांचे शालेय शिक्षण फार साधारण शाळेत झाले.
9. डॉ. कलाम नेहमी पहाटे 4 वाजता उठायचे-
डॉ. कलाम हे नेहमी पहाटे 4 वाजता उठायचे. त्यानंतर ते अंघोळ करून गणिताचे क्लास घेण्यासाठी जात असत. त्यांनी निवडलेल्या फक्त 5 विद्यार्थ्यांना ते गणिताचे धडे द्यायचे. त्या विद्यार्थ्यांनसाठी सकाळी क्लासला येण्याअगोदर अंघोळ करणे ही अट असायची.
10. डॉ. कलाम यांचे गुरु-
डॉ. विक्रम साराभाई हे डॉ. कलाम यांचे गुरू आणि मार्गदर्शक होते. डॉ. साराभाई यांनी कलाम यांना कृतज्ञता आणि यशाचा मार्ग दाखवला.
11. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पूर्ण केली आरोनॉटिकल इंजिनिअरिंग ची पदवी.
मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी आपली आरोनॉटिकल इंजिनिअरिंग ची पदवी पूर्ण केली. त्यांनतर ते इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवडले गेले. DRDO मध्येही त्यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले. भारताच्या पहिल्या देशी उपग्रह SLV-3 च्या प्रक्षेपणात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
12. डॉ. कलाम यांच्यावर डॉ अब्दुल कलाम आझाद हा प्रेरणादायी चित्रपट बनला आहे.
13. डॉ. कलाम यांना युथ आयकॉन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
2003 आणि 2006 साली MTV तर्फे त्यांना युथ आयकॉन या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
14. ते भारताच्या सर्वात महत्वपूर्ण आण्विक चाचणीचे भाग होते.
15. भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून ही पाहिले काम.
16. डॉ. कलाम यांना दाक्षिणात्य पदार्थ विशेष करून इडली खूप आवडायची.
17. एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलताना अचानक लाईट गेली. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठे ही बाधा येऊ न देता डॉ. कलाम सम्पूर्ण विद्यार्थ्यांच्या मधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली.
18. राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राज भवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहुणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एक चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक.
19. डॉ. कलाम यांच्या लहानपणी त्यांचे सर्वात जवळचे तीन मित्र होते. रामानंद शास्त्री, अरविंदम, शिवप्रकसन.. हे तिन्ही जण हिंदू ब्राम्हण कुटुंबातील होते.
20.शेवटचा फोटो-
हा डॉ. अब्दुल कलाम यांचा शेवटचा फोटो आहे. यानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
माहिती अवडल्यास अवश्य शेअर करा.
जाणून घ्या गांधीजींबद्दल आपणास माहिती नसलेल्या गोष्टी
लाल बहादूर शास्त्रींच्या गूढ मृत्यूविषयी या गोष्टी आपणास माहिती आहेत का?