ठाण्यातील रिक्षाचालक ते शिवसेना विधिमंडळ नेता : एकनाथ शिंदेंचा जीवन प्रवास

आमदार आदित्य ठाकरेंनीच पक्षाच्या बैठकीत शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सर्वानुमते त्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यांचा राजकीय अभ्यास, अनुभव, पक्षातील महत्वाचे स्थान आणि अनेक वर्षांची शिवसेनेवरील निष्ठा या बळावर त्यांनी हे पद आपल्याकडे खेचून आणले.

नुकतेच ठाण्यातील कोपरी – पाचपाखाडीचे आमदार म्हणून एकनाथ शिंदे निवडून आले आहेत. यानिमित्ताने त्यांचा शाखाप्रमुख ते विधिमंडळ पक्षनेता हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत…

सातारच्या एकनाथाची ठाण्यात शिंदेशाही

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. शिक्षणाच्या निमित्ताने ते ठाण्यात आले, परंतु आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आपले शिक्षण सोडावे लागले. सुरुवातीच्या काळात त्यांनी मच्छी कंपनीत सुपरवायजर म्हणून काम केले. नंतर रिक्षाचालक म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावाखाली आल्यानंतर शिंदे ठाण्यातील किसननगर शाखाप्रमुख बनले. आनंद दिघेंचे शिष्य म्हणून शिंदेंनी शिवसेनेच्या अनेक आंदोलनात भाग घेतला, तुरुंगवास भोगला. त्या बळावर ठाणे मनपात नगरसेवक, सभागृह नेते आणि ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुखही बनले. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आणण्याची किमया त्यांनी करुन दाखवली.

विधिमंडळ पक्षनेतेपदापर्यंत झेप

२००४ मध्ये ठाणे मतदारसंघातून आमदार बनलेले एकनाथ शिंदे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग आमदार म्हणून निवडून आले.

२०१४ च्या निवडणुकांनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडून आले होते. त्यांनतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यांनतर एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री बनले. जानेवारी २०१९ मध्ये शिंदे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री बनले.

एकनाथ शिंदे हे मितभाषी, अत्यंत शांत आणि संयमी राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत त्यांच्या शब्दा वजन आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता अशी त्यांची सर्वसामन्यांमध्ये ओळख आहे. पक्षाचा एक शाखाप्रमुख त्याच पक्षाचा विधिमंडळातील पक्षनेता बनतो ही अपवादाने घडणारी गोष्ट एकनाथ शिंदेंच्या रूपाने महाराष्ट्राला अनुभवायला मिळाली.

तर शिंदे बनतील मुख्यमंत्री-

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर युतीमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. निकाल लागून ११ दिवस झाल्यानंतरही कोणत्याही पक्षाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही. त्यातच दिवसोंदिवस शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेमुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

जर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले तर सेनेकडून एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकते. असे झाल्यास रिक्षाचालक ते शिवसेना विधिमंडळ नेता बनलेला हा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बानू शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.