कित्येक लोकांना अंड्यातील पिवळा बलक बाजूला काढून मगच अंडी खायला आवडतं. कित्येक जिम ट्रेनरही व्यायामानंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा बलक काढूनच अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामागे फॅट्स वाढतील वगैरे कारणे सांगितली जातात. खरं पाहायला गेलं तर अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये पांढऱ्या बलकापेक्षा अधिक प्रमाणात Calcium आणि Protein असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत.
१) प्रजनन क्षमता वाढते :
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये Omega-3 हे चरबीयुक्त आम्ल असते. त्याच्या सेवनाने माणसाची प्रजनन क्षमता वाढते. २) केसगळती थांबते : अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कॉपर हा घटक असतो. आहारात कॉपरचा समावेश असल्यास माणसाला अकाली टक्कल पडण्यापासून रक्षण होते. ३) स्नायू बळकट होतात : अंड्याच्या पिवळ्या बलकात अधिक प्रमाणात प्रोटिन्स असते, त्यामुळे स्नायू बळकट होतात. स्नायूंना गोळे बनवण्यासाठी हे उपयुक्त असते.
४) हाडे मजबूत होतात :
अंड्याच्या पिवळ्या बलकात मुबलक प्रमाणात Vitamin D आढळते. त्याच्या सेवनाने हाडे चांगल्या प्रकारे मजबुत बनतात. ५) बुद्धी तल्लख बनते : अंड्याच्या पिवळ्या बलकात ९३ % लोह असते. ऍनिमिया सारख्या आजाराची समस्या त्यामुळे दूर होते. ६) हृदयविकार टळतो : अंडे हे एक चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. अंड्याच्या सेवनाने हृदयविकाराची समस्या असणाऱ्या लोकांना या आजारात फायदा होतो.
७) दात मजबूत बनतात :
अंड्याच्या पिवळ्या बलकात फॉस्फरस हा घटकही मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. त्यामुळे आपले दात बळकट होतातच, पण त्यासोबतच हिरड्यांच्या समस्याही दूर होतात. ८) कर्करोग टाळण्यास मदत होते : अंडी हा Vitamin K चा चांगला स्रोत आहे. हे विटामिन कर्करोगामध्ये गुणकारी असते. अंड्याचे सेवन केल्यास कर्करोग टाळण्यास मदत होते. तेव्हा आता इथून पुढे अंडी खाताना त्यातला पिवळा बलक टाकून न देता, त्यासोबतच अंडी खावीत. जेणेकरून अंड्याच्या या लाभदायक गुणांचा आपल्याला उपयोग होईल.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.