राज यांना ईडीनं नोटीस बजावली असून, २२ ऑगस्टला चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. यावरून मनसेचे कार्यकर्ते सुरुवातीला कमालीचे आक्रमक झाले होते. चौकशीच्या दिवशीच ठाणे बंद करण्याचा आणि ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, राज यांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी भूमिका बदलली.
मात्र दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी राज ठाकरे यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं म्हणून राणा बॅनर्जी (असिस्टंट डिरेक्टर ईडी) या ईडीच्या अधिकाऱ्याने समन्स बजावलं आणि त्यांच्या स्वाक्षरीची तारीख १६ ऑगस्ट २०१९ अशी असल्याचं समजतं. सहायक संचालक म्हणून नियुक्त असलेल्या बॅनर्जी यांनीच उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांना बारा तासांहून अधिक काळ चौकशी करत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला होता. मूळचे कस्टम खात्यातील असलेले प्रतिनियुक्तीवर ईडीत आहेत.
बॅनर्जी यांच्या विषयी सोशल मिडिया मध्ये माहिती तपासल्या असता काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर योगायोग का काही कारणामुळे त्यांनी फेसबुक खाते बंद केले आहे. असिस्टंट डिरेक्टर ईडी राणा बॅनर्जी हे फेसबुकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फॉलो करत असल्याचं समोर आलं असून त्यांनी अमित शहांच्या पेजला लाईक सुद्धा केलं आहे. विशेष म्हणजे ते राजकीय व्यक्तींमध्ये केवळ अमित शहांनी फॉलो करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
काही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या फोटोसह बॅनर्जी यांची बातमी दिली. काही कालावधीनंतर बॅनर्जी यांचे फेसबुक अकाऊंट डिलीट झाल्याचे लक्षात आले. दुपारपर्य़ंत दिसणारे बॅनर्जी यांचे अकौंट दिसणे नंतर बंद झाले.
मोठ मोठ्या नेत्याचा तपास करणे तसे जिकरीचे काम आहे त्याकरिता इडी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. इडीने राज ठाकरे यांना तब्बल ३५ प्रश्न विचारले असे मिडिया रिपोर्ट नुसार पुढे आले आहे.
बॅनर्जी यांचे प्रोफाईल व्हायरल होणे आणि ते खाते बंद होणे यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.