सध्या तरुणांमध्ये तसेच बऱ्याच शहरी भागात ई सिगारेटचे व्यसन वाढत असून, द्रवरूप असलेल्या अशा सिगारेटमध्ये निकोटीनचे प्रमाण जास्त आहे. ई-सिगारेटच्या सेवनामुळे वापरकर्त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन जमा होते. तरुणांच्या स्वास्थ्यांवर होणारा नकारात्मक परिणाम, हेच या निर्णयामागचे कारण असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून देशभरात ई सिगरेट आणि ई हुक्कावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याची घोषणा केली आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर देशभरात ई-सिगरेट आणि ई-हुक्का बनवण्यासंबंधी उत्पादन, निर्मिती, आयात-निर्यात, विक्री, साठवण आणि जाहीरातींवर तात्काळपणे पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
आता ई-सिगरेट आणि ई हुक्काच्या वापरावर दंड आणि शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. पहिल्यांदा ई सिगरेट आणि ई हुक्काच्या वापरावर १ लाख रुपयांचा दंड किंवा १ वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ५ लाख रुपयांचा दंड आणि ३ वर्षांचा कारावास किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावण्यात येऊ शकते.
थोडा अभ्यास केल्यावर लक्षात येत आहे या निर्णयामुळे सामान्य लोकांच्या तब्येतीला फायदा तर झालाच सोबतच सरकारला देखील फायदा झाला आहे. तो फायदा कसा झाले ? तर सरकारने दोन तंबाखू कंपनीत गुंतवणूक केलेली आहे. मार्केट मध्ये लिस्टेड आईटीसी लिमिटेड आणि वीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये सरकारनी पैसे गुंतवले आहे. इ सिगरेट बंदी मुळे तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनीना सरळ फायदा होणार.
या कंपनीचा फायदा म्हणजे सरकारला हि याचा फायदा होणार. शेअर मार्केट मध्ये तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअरचे भाव वाढलेले आहे. फक्त एका दिवसात म्हणजे बुधवारी तब्बल १००० कोटीचा या कंपनीना फायदा झाला आहे. ९% पर्यंत या कंपनीच्या शेअरला वाढ मिळाली आहे.
आईटीसी मध्ये सरकारची भागीदारी २८.६४ टक्के, बुधवारी यांच्या शेअर मध्ये १.०३ पर्यंत वाढ झाली आहे. बुधवारी आयटीसीचा शेअर २३९.६० पर्यंत आला होता. आयटीसी मध्ये यूनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची भागेदारी ७.९६ टक्के आहे. आणि एलआयसी मध्ये १६.३२ टक्के एवढी आहे यामध्ये देखील सरकार ला फायदा झाला आहे.
सरकारी इन्शुरन्स कंपन्याची गुंतवणूक तंबाखू उत्पादन कंपन्यात आहे.
जनरल इन्शुरन्स ऑफ इंडिया म्हणजे जीआयसी , न्यू इंडिया इन्शुरन्स आणि इन्शुरन्स इंश्योरेंस यांची यांची आयटीसी मध्ये ४.३६ टक्के हिस्सा आहे. बुधवारी या कंपनीला ८५९ कोटीचा नफा झाला. त्यामुळे हा फायदा सरकारला देखील झाला.
तसेच तंबाखू उत्पादक कंपनी वीएसटी इंडस्ट्री यांचा शेअर ३५६० रुपयापर्यंत आला त्यामध्ये त्यांना ५९.१५ रुपयाचा फायदा झाला.वीएसटी मध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची १.५३ टक्के भागीदारी आहे. या मुळे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला १३७.०७ करोड रुपये एवढा फायदा झाला.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.