PUBG ऑनलाईन गेम खेळून हा मराठी मुलगा कमावतो रोज लाखो रुपये..

भारतात ऑनलाईन गेमिंग सेक्टर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि सध्या वेगवेगळ्या ऑनलाईन गेम ची चलती आहे. पण जगभरासहित भारतात एक ओनलाईन गेम जो मोबाईल आणि पीसी वर मोठ्या प्रमाणे लोकप्रिय झाला आहे. तो गेम म्हणजे PUBG हा गेम मोबाईल आणि पीसी दोन्हीकडे अत्यंत लोकप्रिय झाला आहे. पण सध्या PUBG मोबाईल वर जास्त प्रमाणात खेळल्या जातो आहे.

PUBG बद्दल एवढे सांगायचे कारण काय असे आपल्याला वाटत असेल तर एका गेमर चा आपण परिचय करून घेणार आहोत. जो गेमर आजच्या घडीला भारतात PUBG Game चा गॉड म्हणून हि ओळखला जातो. मित्रानो या गेमिंग क्षेत्रात आज सर्वात टॉप वर असणारा हा व्यक्ती एक मराठी आहे हे अजून विशेष, या मुलाचे नाव आदित्य सावंत हे आहे आणि तो मुंबईत राहतो.

या व्यक्तीला ऑनलाईन क्षेत्रांत Dynamo या नावाने ओळखले जाते. आणि त्याचे युट्युबवर Dynamo Gaming हे चॅनल प्रसिद्ध आहे. त्याचे युट्युबवर एकून subscriber हे १८ लाख २७ हजार एवढे आजच्या घडीला आहेत. गेमिंग मध्ये भारतात सध्या टॉप वर आहे. या माध्यमातून आता चांगली कमाई सुद्धा Dynamo ची होते. दिवसातून दोन ते तीन वेळा लाईव्ह स्ट्रीम आदित्य करत असतो आणि एका स्ट्रीम मधून सुपर चॅट च्या माध्यमातून त्याला चांगली कमाई होते. तसेच युट्युब जाहिरातीच्या माध्यमातून महिन्याला ४ ते ५ लाख रुपये कमाई Dynamo ची होते.

आज Dynamo ने गेमिंग क्षेत्रात आपले स्थान बळकट केले आहे. अगोदर वेगवेगळे गेम तो खेळायचा पण PUBG मुळे अत्यंत कमी कालावधी मध्ये सध्या तो टॉप वर आहे. कोणत्याही क्षेत्रात मनापासून मेहनत घेतली तरी यश मिळतेच हे आदित्य सावंत याने दाखवून दिले आहे. त्याला त्याचे चाहते PUBG चा गॉड म्हणतात पण तो स्वतःला एक सामान्य गेमरच म्हणवून घेतो.

डायनमोचा गेम युट्युबवर लाइव असताना किमान ५० ते ६० हजार लोक त्याचा गेम बघतात व त्याला युट्युब सुपर चैट आणि पेटीएमच्या माध्यमातून त्याला त्याच्या खेळा डोनेशन देतात. पालक नेहमी आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनीयर होण्यास प्रोत्साहन देतात परंतु डायनमो कडे बघून आता मुले गेमिंग करीयर कडे पण वळतील.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.