खरोखरच सध्याचे जीवन धावपळीचे झाले आहे. माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. स्वतःकडे होणाऱ्या या दुर्लक्षामुळे माणसाचे मन स्थिर राहत नाही. मानसिक आणि शारीरिक ताणासोबत चिडचिडेपणा आणि नैराश्य येते. त्यातून परत ताण आणि चिडचिडेपणा अशी साखळी सुरु राहते.
माणूस त्यातच अडकून जातो आणि त्याचा परिणाम माणसाच्या वागणुकीवर पडून कुटुंबात, कामाच्या ठिकाणी वाद, मग त्यातून व्यसनाधीनता असे वेगवेगळे परिणाम समोर येतात. हे सगळं होतं केवळ माणसाने स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे ! रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. त्यासाठीच ध्यानाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
ध्यान का करावे ?
ध्यान ही अष्टांग योगातील सातवी पायरी असल्याचे महर्षी पतंजलींनी सांगितले होते. ध्यानधारणेतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग अनेक साधुसंतांनी सांगितला आहे. वैज्ञानिकदृष्ट्याही ध्यानाचे महत्व प्रतिपादन करण्यात आलेले आहे. मन आणि चित्त शांतीसाठी ध्यान आहेच परंतु स्वतःला रोजच्या रोज उत्साही आणि निरोगी ठेवण्यासाठीही ध्यान उपयुक्त आहे. ध्यानाने माणसाचे चंचल मन शांत होते. ताणतणाव दूर होतात. मेंदूची कार्यक्षमता वाढते. महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यानच्या समस्या दूर होतात.
ध्यान कसे करावे ?
ध्यान नेहमी ठराविक जागी, वेळी आणि आसनातच करावे. साधारणपणे पहाटे ध्यान करणे उत्तम असते. जिथे ध्यान करणार आहात त्या जागेची स्वच्छता करावी. स्वच्छ हातपाय धुवून आसनात बसावे. ध्यान अधिक वेळ चालावे यासाठी सूर्यनमस्कार, वेगवेगळे प्राणायाम उदा. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम, विलोम भ्रामरी इत्यादि.
यांचा सराव करावा. पाठीचा कणा ताठ ठेवून कुठल्याही आसनात बसावे. डोळे मिटून हात ज्ञानमुद्रेत गुडघ्यांवर ठेवावे. श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करावे. दुसऱ्या विचारांकडे मन जायला लागले की पार्ट श्वासोच्छवासावर केंदित करावे. दररोज २० मिनिटे हा व्यायाम महिनाभरातच परिणाम दिसून येतील.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.