१ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्याअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलिस पूर्णपणे सतर्क झाले आहेत आणि सातत्याने प्रचंड पावत्या फाडत आहेत.
अनेक लोक तक्रारी करत आहेत की ट्राफिक नियमांचे उल्लंघन न करताही पोलिस दंडाच्या पावत्या फाडत आहेत. जर एखाद्याने एकाच नियमाचे उल्लंघन केले असेल तरीही त्यावर अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून मोठा दंड आकारला जात आहे.
ट्राफिक पोलिसांनी चुकीचा दंड आकारल्यास हे करा
जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे पालन केले असेल आणि तुमच्या वाहनाला दंड आकारला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचे वकील उपेंद्र मिश्रा यांचे म्हणणे आहे की ट्राफिक पोलीस तुम्हाला ऑन द स्पॉट दंड भरण्यासाठी भाग पाडू शकत नाहीत.
संबंधित भागातील कोर्टात जाऊन तुम्हाला दंड भरावा लागेल. अॅडव्होकेट मार्कंडेय पंत म्हणाले की तुम्ही कोर्टात जेव्हा जाल तेव्हा तुमच्यासमोर दोन पर्याय असतील. एक म्हणजे कोर्टात गुन्हा कबूल करुन दंड भरणे किंवा दंड भरण्यास नकार देणे.
हा पर्याय निवडला तर दंडापासून वाचू शकता
कोर्टात तुम्ही दंड भरण्यास नकार दिल्यास कोर्टात समरी ट्रायल घेतली जाते. दंडाच्या पावतीवर एका साक्षीदाराची सही असणे आवश्यक असते. समरी ट्रायलच्या वेळी वाहतूक पोलिसांना त्या साक्षीदाराची साक्ष द्यावी लागते.
बहुतांश घटनांमध्ये पोलिस साक्ष सादर करण्यास पोलिस अक्षम ठरतात. अशावेळी पोलिस साक्षीदारास उपस्थित करण्यास असमर्थ ठरले तर तुमच्यावरील दंडाच्या कारवाईचा खटला फेटाळून लावला जातो. समरी ट्रायल म्हणजे खटला त्वरित निकालात काढला जातो.
ऑनलाईनही दंड भरता येईल
जर ट्रॅफिक पोलिसांनी आपल्या वाहनाला दंड आकारला असेल तर आपल्याला ऑन द स्पॉट दंड भरण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. आपल्याकडे परिसरातील कोर्टात जाऊन किंवा https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan वर ऑनलाईन दंड भरण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे.
याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, विमा, आरसी किंवा प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसल्यास पोलिस आपले वाहनही जप्त करू शकतात. यानंतर जेव्हा वाहन मालक सर्व कागदपत्रे सादर करतील तेव्हाच न्यायालयातून वाहन सोडले जाईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.