एका बाजूला देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, परंतु भारतामध्ये असे एक गाव आहे जिथे मागच्या ९७ वर्षांपासून लोकसंख्या वाढली नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याजवळील धानोरा या गावात गेल्या ९७ वर्षांपासून लोकसंख्या फक्त १७०० आहे.
ज्याप्रकारे या गावानेआपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे त्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे परंतु त्यामागे एक वेगळीच कथा आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे ती कथा…
काँग्रेसची बैठक आणि निर्णय ठरला…
स्थानिक रहिवासी एस.के.महोबया यांनी याबाबत सांगितले की, १९२२ मध्ये कॉंग्रेसने या गावात एक बैठक घेतली होती. या बैठकीला अनेक अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये कस्तूरबा गांधींचा देखील समावेश होता. या बैठकीत कस्तुरबा गांधींनी “लहान कुटुंब सुखी कुटुंब” अशी घोषणा दिली.
त्यांच्या या घोषणाने गावकरी खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी ती आचरणात आणण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी मुलगा मुलगी असा फरक केला नाही. प्रत्येक कुटुंबाने कुटुंब नियोजन ही संकल्पना अवलंबली.
कोणत्याही कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुलं नाहीत
स्थानिक पत्रकार मयंक भार्गव सांगतात की येथे कोणत्याही कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुलं नाहीत. हे गाव कुटुंब नियोजनाचे मॉडेल आहे. इथले लोक मुला-मुलींमध्ये भेदभाव करत नाहीत आणि एक किंवा दोन मुले जन्माला घालण्याच्या निर्णयावर कुटुंबे ठाम आहेत.
आजूबाजूच्या अनेक गावातील लोकसंख्या चौपट वाढली असताना धानोरा गावाने गेल्या ९७ वर्षांपासून आपली लोकसंख्या टिकवून ठेवली आहे. कुटुंब नियोजनाची संकल्पना आणि त्याचे फायदे धानोरा ग्रामस्थांना माहित आहेत. धानोरा हे एक लहान गाव आहे, परंतु हे गाव केवळ देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी कुटुंब नियोजनाचे एक मॉडेल आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.