अमुक उमेदवाराचे जप्त करु, तमुक उमेदवादाचे डिपॉझिट जप्त झाले अशा प्रकारच्या बातम्या किंवा वाक्ये निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान किंवा निकालानंतर आपल्या सर्वांच्या कानावर हमखास पडतात.
सर्वसामान्य लोकांना डिपॉझिट जप्त होतं म्हणजे नक्की काय होतं हे माहित नसतं, परंतु सर्वांनाच त्याचे कुतूहल वाटते. अनेकदा लोकांना तर असे वाटते की जिंकून आलेल्या उमेदवाराला समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट मिळते, पण असे नसते. आज या लेखाच्या माध्यमातून आपण डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय असते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणे म्हणजे नक्की काय असते ?
निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार आपले भवितव्य आजमावण्यासाठी मैदानात उतरत असतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांना आपल्या नाव, पत्त्यापासुन ते कायदेशीर बाबी, उत्पन्नाचे स्रोत इत्यादिची सर्व माहिती द्यावी लागते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करत असताना १०००० रुपये डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना यात सूट असून त्यांना डिपॉझिट म्हणून ५००० रुपये इतकी रक्कम भरावी लागते.
कसे होते डिपॉझिट जप्त ?
एखादा उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, त्याच मतदारसंघात इतरही उमेदवार निवडणुकीत उभे असतात. निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्या संबंधित जागेवर एकुण जितके मतदान झाले असेल, त्याच्या एक षष्ठांश म्हणजेच १६.६% मते प्रत्येक उमेदवाराला पदवी लागतात.
जर एखाद्या उमेदवाराला १६.६% मते पडली नाहीत, तर त्याने अर्ज दाखल करताना डिपॉझिट म्हणुन जी रक्कम भरलेली असते, ती जप्त होते. ही जप्त झालेली डिपॉझिटची रक्कम निवडणुक आयोगाला मिळते. निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणे म्हणजे उमेदवाराचा अपमान समजला जातो.
बारामतीत अजित पवारांनी केले सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची पद्धत १९५१-५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकांपासून चालत आली आहे. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ९१% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचा विक्रम झाला होता.
२०१४ मध्येही ८५% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांनी जवळपास १ लाख ६५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला, यामध्ये प्रतिस्पर्धी सर्वच्या सर्व ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यामध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.