दिल्ली जिंकण्यासाठी केजरीवालांनी मागच्या वर्षीपासुनच खेळले होते हे पाच डावपेच

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकून भाजपला धोबीपछाड दिली असली तरी एक वेळ अशी होती जेव्हा आम आदमी पक्षाच्या हातुन ही निवडणुक निसटत चालली होती. परंतु आम आदमी पक्षाने वेळीच धोका ओळखली आणि ते सावध झाले. दिल्ली विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी केजरीवालांच्या नेतृत्वाखाली मे २०१९ मध्येच एक योजना आखण्यात आली आणि वर्षभर त्यावर आमल करण्यात आला. या योजनेत पाच राजकीय डावपेच खेळण्यात आले. परिणामी दिल्लीच्या सत्तेवर पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणुन आरुढ होत आहेत.

काय होते ते केजरीवालांचे ५ डावपेच

१) आम आदमी पक्षाने सर्वप्रथम दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच असतील, अशा पद्धतीने त्यांचा रोल निश्चित केला. अरविंद केजरीवाल हे मोदींच्या विरोधात लढणारा विरोधी चेहरा नसून दिल्लीच्या जनतेचे प्रश्न सोडवणारा चेहरा आहे ही गोष्ट ठसवली आणि व्यक्तिमत्वातही तसाच बदल केला. त्याबरोबरच दिल्लीच्या जनतेशी संबंधित नसणारे मुद्दे केजरीवालांनी आपल्या भाषणात घेतले नाहीत.

२) ‘आप’ने दुसरी गोष्ट अशी केली की सरकारी जाहिरातींमध्ये दिसणारे केजरीवालांचे फोटो बदलण्यात आले. त्यांच्या पूर्वीच्या फोटोंमध्ये ते रागामध्ये किंवा आंदोलन करताना दिसायचे. ते बदलून त्यांचे सामान्य कपड्यांत हसतानाचे फोटो पुढे आणण्यात आले. ज्यामुळे ते लोकांना आपल्या घरातील मोठ्या भावाप्रमाणे विश्वासदर्शक वाटतील.

३) निवडणुकीपूर्वी ‘आप’ने रिपोर्ट कार्ड देऊन पक्षाच्या नावावर कायकाय आहे ते सांगितले. स्वतःविषयी विश्वास निर्माण केला. रिपोर्ट कार्डमध्ये आम्ही खुप विकास केला किंवा दिल्ली बदलली अशी कुठलीही गोष्ट दिली नाही. त्याऐवजी जी कामे केलीत ती मुद्देसूदपणे देण्यात आली.

४) “लगे रहो केजरीवाल” स्लोगनने कमाल केली. या स्लोगनच्या माध्यमातून एका दिवसात दिल्ली बदलणार नाही, परंतु केजरीवाल निरंतर काम करत राहिले तर नक्कीच दिल्ली बदलेल अशा प्रकारचा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात आला.

५) ‘आप’ने मागच्या पाच वर्षात कुठलीही निवडणूक जिंकली नव्हती. लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुका, महानगरपालिका, विद्यापीठ निवडणुकांत अपयश आल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना केजरीवालांनी भाजपने केलेल्या चुकांचा लाभ उठवला. भाजपने केजरीवालांना आतंकवादी आणि हिंदुविरोधी ठरवले. परंतू केजरीवालांनी त्वरित हनुमान चालीसा घेऊन भाजपच्या या मुद्द्याला प्रत्युत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.